६४
ब्राह्मणी धर्माच्या सभोवार बांधलेले जे तीन कोट,
पैकी अस्पृश्यता बाहेरचा कोट
मुंबईत माटुंगा येथे कुमार विनयमंदिर या भलत्याच नांवाची अस्पृश्य विद्यार्थ्यांकरिता राष्ट्रीय स्त्रीसंघानें चालविलेली एक शाळा आहे. ही शाळा रा. गांधी यांच्या असहकारितेच्या चळवळीच्या धामधुमींत स्थापन करण्यांत आली होती. असहकारिता जरी आज सर्वत्र लोपत चालली आहे, तरी या शाळेच्या मूळस्वरूपांत फारसा फेरबदल झालेला नाहीं. या शाळेंचे हल्लींचें मुख्याध्यापक मि. शेट्ये या नांवाचे एक गृहस्थ आहेत. त्यांनी मोठी मेहनत घेऊन शाळेतील विद्यार्थ्यांचा एक मेळा तयार केला, व तो गणपतीसमोर येऊ देण्याबद्दल बऱ्याच सार्वजनिक गणेशोत्सव-कमिट्यांकडे विनंती अर्ज केलें. तशाच प्रकारचा एक अर्ज मुंबईच्या शंकरवाडीतील ब्राह्मण सभेच्या गणेशोत्सव-कमीटीकडेहि त्यानीं केला होता. परंतु नवलाची गोष्ट हीं की, हा कुमार विनयमंदिरांतील अस्पृश्य मुलांचा मेळा आपल्या गणपतीपुढें येऊं द्यावा किंवा नाहीं, या प्रश्नावर ब्राह्मण सभेंत जसें वादळ झालें तसें अन्यत्र कोठेच झालें नाहीं. प्रथमतः ब्राह्मण सभेच्या व्यवस्थापक मंडळानें इतर मेळे आणिले जातात त्या ठिकाणीं ब्राह्मण सभेच्या गणपतीपुढें या मेळ्यास येऊं द्यावें असा ठराव बहुमताने पास केला. परंतु असा ठराव करणें हें व्यवस्थापक मंडळाच्या अधिकारांतलें नसून तसा ठराव करण्याचा अधिकार फक्त साधारण सभेसच आहे, अशा सबबीवर ब्राह्मण सभेच्या कांहीं सभासदांनी संस्थेची सर्वसाधारण सभा या प्रश्नाचा निकाल करण्यासाठी बोलावण्यांत यावी, अशा अर्थाचा एक अर्ज ता. १८ ऑगस्ट रोजीं व्यवस्थापक मंडळाकडे करण्यांत आला. त्याप्रमाणें ता. २८ रोजी साधारण सभा बोलाविण्यांत आली; व तेथेंहि व्यवस्थापक मंडळानें केलेला पूर्वीचाच ठराव बहुमताने पास झाला. व त्याप्रमाणे रा. शेट्ये यांनाहि कळविण्यांत आलें. परंतु ज्यांना हा ठराव कबूल नव्हता, अशा सुमारे १२५ पुराणमताभिमानी सभासदांनी ता. २८ रोजी भरलेली सभा गैरकायदेशीर होती व त्यांत ब्राह्मणसभेंचे सभासद नसलेल्या लोकांनी मतें दिली, अशा सबबीवर त्याच प्रश्नाचा पुन्हा रितसर