ब्राह्मणी धर्माच्या . . . बाहेरचा कोट २८३
विचार करण्याकरितां ब्राह्मण सभेची दुसरी सर्वसाधारण सभा बोलवावी असा अर्ज व्यवस्थापक मंडळाकडे केला. त्याप्रमाणे ता. ९ सप्टेंबरला पुन्हा सर्व साधारण सभा भरविण्यांत आली. मध्यंतरी उभय पक्षांच्या पुष्कळ सभा झाल्या. परंतु त्या सर्वात विरोधकांना अपयशच आलें. शापादपिशरादपि ब्राह्मणब्रुव एवढ्यानें थांबले नाहीत. त्यांनी ब्राह्मण सभेवर हायकोर्टात फिर्याद केली व ता. २८ ऑगस्टचा ठराव अमलांत आणू नये म्हणून मनाई हुकूम मागितला. पण त्यांच्या ुर्दैवानें तोहि त्यांना मिळाला नाही. अशा प्रकारे अस्पृश्यता निवारकवाल्यांचा विजय होत असता कांही अवसानघातकी लोकांनी ता. ९ सप्टेंबरच्या सभेत अस्पृश्यांच्या मेळ्याला इतर मेळे येतात तेथवर येऊं द्यावें किंवा नाहीं, हा ठराव मांडण्याऐवजीं “कुमार विनयमंदिराच्या मेळ्याला सभेच्या मांडवांत येऊं द्यावें, तेथे त्यांचा कार्यक्रम झाल्यानंतर श्रींच्या दर्शनासाठी मेळ्यांतील मुलांना दिवाणखान्यापर्यंत नेऊन तेथे त्यांना श्रींचा प्रसाद द्यावा,” असा समेटाचा ठराव मांडण्यात आला ! ! या ठरावाचे जनक डॉ. भाजेकर हे होते ! त्यांनीच हा ठराव मांडला, व तेच या सभेचे अध्यक्ष होते. ठराव मांडल्यावर सभाजनांच्या आग्रहावरून विरोध करणारांचीं व पाठिंबा देणारांची पांच पांच मिनिटे भाषणें झालीं. परंतु शेवटी ठरावावर मतें घेण्याची वेळ आली असतांना मतांची मोजणी कोणत्या प्रकारें करावीं यावर वाद माजून आरडाओरड सुरू झाली. कदाचित् समेटाचा ठराव नापास होईल या भयानें झालेल्या गोंगाटाचा फायदा घेऊन मतें घेतल्याशिवाय सभा बरखास्त झाली असें जाहीर करण्यास सांगून अध्यक्ष निघून गेले; व उपस्थित झालेल्या प्रश्नावर अखेरचा निकाल दिल्याखेरीज सभा
संपली !!
सभेचें वरीलप्रमाणें पर्यवसान झाल्यामुळे व दुसऱया दिवशीं गणपतींचे विसर्जन व्हावयाचे असल्यामुळे कुमार विनयमंदिराच्या मेळ्याच्या अर्जासंबंधी काय करावयाचें याचा निर्णय करण्यासाठीं ब्राह्मण सभेच्या व्यवस्थापक कमिटीची निकडीची सभा ता. १० सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजतां भरली होती. तिनें ता. २८ ऑगस्ट रोजी पास झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्याऐवजी सभेंत पास न झालेल्या अशा समेटाच्या ठरावाची अंमलबजावणी करावी असा निर्णय दिला ! ! व त्याप्रमाणे रा. शेट्ये यांना आपला मेळा आणण्यास सांगितले. व रा. शेट्ये यांनीं आपला मेळा त्या ठिकांणीं नेला. ध्यांनात घेण्यासारखी गोष्ट ही की, या मेळ्याचा सभागृहाच्या पायरीला पाय लागू नये अशी व्यवस्था करण्यात आली होती | मेळ्यांतील मुलांना सभागृहाच्या समोरच्या मोकळ्या जागेवर पद्यें