ब्राह्मणी धर्माच्या सभोंवार बांधलेले जे तीन कोट, पैकी अस्पृश्यता बाहेरचा कोट. - Page 328

२८४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

म्हणावयास लाविंलें. अगदींच उघड्यावर उभें केलें असें वाटू नये म्हणून या मोकळ्या जागेवर तात्पुरता मंडप घालण्यात आला होता. Tel म्हणून झाल्यावर मेळ्यांतील मुलांनी गणपतीचे दर्शन कोठून व कसें घ्यावें याविषर्यी वाद निघाला. त्यांत बाहेरच्या जिन्यावरून एकेका मुलानें गणपती बसविलेल्या दिवाणखान्याच्या दाराबाहेरून दर्शन घ्यावें असें सुचविण्यांत आलें. एकेका मुलाला जाऊं देण्यांत मुलें अतिक्रम करतील अशी शंका त्याच्या मुळाशीं असून विनय मंदिराच्या विनयावर वाढलेल्या मुलांवर हा शिंतोडा नसून पर्यायाने तों आपल्या स्वतःवर आहे, असे रा. शेट्ये यांना वाटल्यावरून ती सूचना त्यांनी अमान्य केली. वाद येवढ्यापुरताच होता. कारण दिवाणखान्याच्या बाहेरून मुलांनी गणपतींचे दर्शन घ्यावें, ही गोष्ट रा. शेट्ये यांना नापसंत नव्हती. शेवटी जिन्यावर व दिवाणखान्याच्या पांच दरवाज्यांवर दोनदोन माणसांचा पहारा ठेवून मुलांना वर नेण्यांत आलें ; व बाहेरच्या गॅलरींतून त्यांनी देवदर्शन घेतले. नंतर ब्राह्मणसभेचे कार्याध्यक्ष रा. काणे यांनी मुलांना प्रसाद दिला ! अशा रीतीनें या दर्शनपिपासू मुलांचे व त्यांच्या अध्यापकाचें स्वागत झाल्यानंतर हा मेळा आपल्या स्थानी परत आला ! !

ज्या ब्राह्मणसभेच्या सभासदांनीं भेटीबंदीचा कोट मोडून अस्पृश्यांना आंत आणण्याचा प्रयत्न केला, ते आपल्या हाती घेतलेला पण शेवटास नेतील अशी आमची अपेक्षा होती. परंतु आश्चर्याची गोष्ट ही की, इरेस चढलेले हे लोक आपला पण सोडून देऊन आपल्या प्रतिपक्षाला शरण गेले ! युद्धाचा निश्वय करून संग्राम करण्यास सज्ज झालेले हे लोक शरण गेले ते अल्पसंख्याक होते म्हणून शरण गेले हें जर खरें असते तर त्याचें आम्हांस कांहीच आश्चर्य वाटलें नसतें. परंतु त्यांचे मागे एवढे प्रचंड लोकमत होते की, करू ती पूर्व असे त्यांना छातीठोकपणे आपल्या प्रतिपक्षास म्हणतां आलें असतें. परंतु केवळ मताधिक्याच्या जोरावर हा प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न केला तर त्यामुळे ब्राह्मणसभेंत फूट पडणें अपरिहार्य होईल, म्हणून सभासदांनी हा प्रश्‍न सभेच्या भवितव्याच्या दृष्टीनें व समेटाच्या भावनेने सोडविला पाहिजे, म्हणून करूं ती पूर्व असे सांगण्याचा अधिकार प्राप्त झाला असतांहि तो अधिकार सोडून म्हणाल ती पूर्व या अटीवर ओढघस्तीस आलेल्या प्रतिपक्षाशी या लोकांनी तहनामा केला. त्यांचा वरील युक्तिवाद आम्हांस पटतो. आतां हिंदुसमाजाचे ऐक्य ही महत्वाची बाब आहे किंवा ब्राह्मण सभेचे ऐक्य ही महत्वाची बाब आहे या राष्ट्रीय दृष्टीनेंहि या प्रश्‍नाकडे पाहणे अवश्य होतें. परंतु राष्ट्रांचे नांव व आपला गांव या लफंगेगिरीला राष्ट्रीय चळवळ