ब्राह्मणी धर्माच्या . . . बाहेरचा कोट २८५
असें गोंडस नांव देऊन अज्ञ जनतेला फसवीत आलेल्या या लोकांना असली व्यापक दृष्टी असणे शक्य नाही. व्यापक दृष्टी नसली तरी नसो. पण ब्राह्मण सभेच्याठायी व्यापक बुद्धि तरी असावयास पाहिजे होती. केवळ ब्राह्मणसभेच्या भवितव्याच्या दृष्टींनेंच जर या प्रश्नाचा निकाल करणें इष्ट होतें, तर मग उभय पक्षांत एवढे रण तरी कां माजवलें गेलें हेंच आम्हांस समजत नाहीं. ब्राह्मणसभा ही ब्राह्मणांची संस्था आहे, तिची उभारणी करण्यांत शंकराचार्यांसारख्या धर्ममार्तडापासून तो साध्या भिक्षुकापर्यंत अखिल ब्राह्मण ज्ञातीनें पै पैसा जमवून हातभार लावलेला आहे. अशा संस्थेत अस्पृश्यता मानणारे लोक नसले तर ते अन्यत्र कोठे असूं शकणार ? अस्पृश्यता हा ब्राह्मणी धर्माच्या सभोंवार जे भेटीबंद, रोटीबंद व बेटीबंद असे तीन कोट बांधलेले आहेत त्या पैकी हा अगदी बाहेरचा कोट आहे. हा भेटी बंदीचा बाहेरचा कोट फुटला व शत्रु आत आले तर ते सहज रोटी बंदीचा कोट फोडतील व तो जर फुटला तर बेटी बंदीच्या कोटाचे संरक्षण करणे अशक्य जाईल, व शेवटी ब्राह्मणी धर्माचा भयाभंग होईल, तेव्हा भेटी बंदीच्या कोटाचे दरवाजे उघडून शत्रूला आंत घेऊन त्यास आपल्यावर मात करण्यास संधी देण्याऐवजीं, ह्या बाहेरच्या कीटावर सज्ज होऊन आंत येऊ पाहणारांचा प्रतिकार करणें हें ब्राह्मणी धर्माच्या संरक्षणार्थ शहाणपणाचे लक्षण आहे असें ब्राह्मणी धर्माच्या भक्तांना वाटणे साहजिक आहे. ज्या ब्राह्मण सभेच्या सभासदांनी भेटी बंदीचा कोट मोडून अस्पृश्यांना आत आणण्याचा प्रयत्न केला त्यांना ब्राह्मण सभेंत आपल्या विचारांच्या विरूद्ध कांही सभासद आहेत याची जाणीव नव्हती असें केव्हांही म्हणता येणार नाहीं. तेव्हां त्यांनी जी उचल घेतली ती या बिरोधकांविरूद्ध सामना करून त्यांचा पाडाव करावयाचा या भावनेनेच घेतली असली पाहिजे. या सामन्यांत अस्पृश्यासारख्या परकीय समाजाकरितां
आपणास ब्राह्मण समाजांत दुही करावी लागेल हें सूर्य प्रकाशाइतके स्पष्ट
होते. ती जबाबदारी जर या सुधारकांना घ्यावयाची नव्हती तर त्यांनी हें वादळ उत्पन्न करून काय साधलें हेंच कळत नाहीं.
ब्राह्मण समाजांत दुफळी व्हावयाची ती झालीच, आतां या वादाचे पर्यवसान ज्या समेटाचे ठरावांत झालें त्या ठरावानें जर अस्पृश्य लोक संतुष्ट होते, तर झाला हा वाद बरा झाला असें आम्ही म्हणालों असतों. परंतु आमचे असें स्पष्ट मत आहे कीं, या ठरावाने अस्पृश्य लोक संतुष्ट होणें शक्य नाहीं. ब्राह्मणशाहीं कांहीं सामान्य नव्हे. समर्थ आहे, अधिकारारुढ आहे, तसेंच ती धूर्त आहे. अर्थात स्वतःचे अधिकारास बाध न येतां अस्पृश्यांस जें देतां येईल तेंच देईल व आपण मोठेसें कांहीं देतों आहोंत असें भासवील. पण आमच्या ब्राह्मणशाहीने हैं ध्यांनात घ्यावें कीं, आतांचे अस्पृश्य लोक भोळे नाहींत, ते दक्ष आहेत त्यांना पाहीजे काय याची जाणीव आहे व जें मिळालें तें तपासून घेण्याची अक्कल आहे. अस्पृश्यांना