६५
उच्च शिक्षण ही एकाच वर्गाची मिरास होणे
राष्ट्राच्या दृष्टीने मोठी घातुक गोष्ट
मुंबई विश्वविद्यालयानें मॅट्रिक व बी. ए. या दोन परिक्षांत पास झालेल्या विद्यार्थ्यांची वर्गवारी नुकतीच प्रसिद्ध केली. ही वर्गवारी खालीलप्रमाणें आहे :—
१. मॅट्रिकमध्यें एक लक्ष लोकसंख्येला पारशी लोकांत ३००, खिस्ती
लोकांत ७०, हिंदूंत २० व मुसलमानांत ४ विद्यार्थी पास झाले.
२. एकंदर पास झालेल्या ४१२१ विद्यार्थ्यांमध्यें १६८ मुली होत्या. त्यांत
६९ हिंदु, ५० हिंदी खिस्ती व ४२ पारशी होत्या. म्हणजे तीन लाखांला पारशी
मुलींचे प्रमाण १५०, हिंदीं खिस्ती मुलींचे प्रमाण ५० व हिंदु मुलींचे प्रमाण १
असें आहे.
३. बी. ए. च्या परीक्षेत प्रत्येकी एक लक्ष लोकसंख्येत ७५ पारंशीं,
१३ हिंदी खिस्ती, ४ हिंदु व १ मुसलमान असें प्रमाण आहें.
हिंदूंची व मुसलमानांची लोकसंख्या इतर धर्मीयांपेक्षां अधिक असल्याकारणांने त्यांच्यांत शिकलेल्यांची संख्या जास्त दिसते. पण खरोखर हे लोक शिक्षणांत इतकें मागें आहेत की त्याची कल्पना देखील होणें शक्य नाहीं. ती होण्यास वरील आकड्यांची मदत होईल म्हणून ते दिलें आहेत. वर दिलेल्या हिंदु या वर्गवारीत ब्राह्मणांचाच विशेष भरणा आहे हें ध्यांनात ठेवलें म्हणजे बिचारे ब्राह्मणेतर व अस्पृश्य यांचा उच्च शिक्षणांत कोठें मागमूस नाहीं हेंहि ध्यानांत येईल. याकडे सरकारनें लक्ष देणें अवश्य आहे. कारण उच्च शिक्षण ही एकाच वर्गाची मिरास होणें राष्ट्राच्या दृष्टीनें मोठी घातुक गोष्ट आहे. पण सरकारचेच कांहीं अधिकारी बेकार पदवीधराची बेसुमार वाढ होऊन असंतोष पसरल्याने इंग्रजी राज्यास धोका आहे या सबबींवर कॉलेजांतील विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित करावी असा ध्वनि काढीत आहेत. नुकतेच कोठें ब्राह्मणेतर व अस्पृश्य कॉलेजच्या पायरीवर पाय ठेवीत आहेत ! तोंच विद्याधिकारी अंमलदारांनी वरील प्रकारच्या नियमांचें घोडे दामटण्यास सुरवात करावी ही मोठ्या दुर्दैवाची गोष्ट आहे. उच्च प्रतीचे शिक्षण मर्यादित करून कोणत्याहि वर्गास त्यापासून