२९० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
जाऊं देण्यास लोक तयार नाहींत म्हणून ज्या मर्यादेपर्यंत आज इतर स्पृश्य हिंदूंना देवळांत जातां येतें ती मर्यादा कमी करणें, यांत मुत्सद्दीपणा असला तरी तो अस्पृश्यता निवारणाच्या ध्येयास पोषक आहे असें आम्हांस वाटत नाहीं. अशा समतेच्या झगड्यांत वरच्यास खालीं लोटण्याऐवजीं खालच्यास वर ओढणें हाच प्रगतीचा मार्ग विशेष श्रेयस्कर आहे असें कोणीही कबूल करील. ठरावांतील दुसऱ्या व तिसऱया अटी इतक्या घातुक आहेत कीं त्या जर अमलांत आल्या तर ही सारी तडजोड अगदीं बेमालूमपणें निकामी ठरली जाईल. पृथकपणें विचार केला तर या अटी फायदेशीर अशा दिसतात. परंतु त्या दोन्हीं एकत्र केल्यास त्यांचा परिणाम असा होईल कीं, ज्या काळांत अस्पृश्य लोकांना देवळांत जाण्याची बंदी राहील तेवढ्या काळांत स्पृश्य लोक देवळांत जावून आपला कार्यक्रम उरकून घेतील व ज्या काळांत अस्पृश्य लोकांना देवळांत जाण्याची मोकळीक ठेविली जाईल त्या वेळीं स्पृश्यलोक देवळाचें दार चढणार नाहींत. एकूण अशा योजनेने एका देवळाची कालमानानें दोन देवळे केल्यासारखें होईल. एका कालभागांत हँ देऊळ स्पृश्यांकरितां व दुसऱ्या कालभागांत तेंच देऊळ अस्पृश्यां करितां असा अनिष्ठ परिणाम घडल्या शिवाय राहाणें शक्य नाहीं. त्यांतल्यात्यांत अस्पृश्यांची घटका सरून स्पृश्यांची घटका लागण्यापूर्वी मध्यंतरीच्या अवधींत Gara सडासंमार्जन करून देवळाची शुद्धी करण्याची खबरदारी घेतली म्हणजे या तडजोडीच्या ठरावानें घडवून आणलेली नवी परिस्थिति व परंपरेने पुनीत झालेली जुनी परिस्थिति या दोन्हींत पाहूं गेलें असतां कांहीं अंतर दिसणार नाहीं. या तडजोडीच्या ठरावाने आमच्या मतें सर्वांचीच फसवणूक झाली असती. भेटीबंदीचें उच्चाटन तर झाले नसतेंच; फारतर भेटीबंदीला कायम ठेवतां स्पृश्यां अस्पृश्यांतींल भेटीबंदीच्या रूढीस कोणत्याही Ged हात न लावितां स्पृश्यांच्या देवळांत अस्पृश्यांचा प्रवेश झाला असें फारतर म्हणतां येईल.
सदरहु तडजोडीला कमीटीनें मान्यता दिली नाहीं याबद्दल आम्हांस सर्वपरी आनंद होत आहे. तसाच तो बें. बागवे यांनाहि होत असेल अशी आमची खात्री आहे. कारण या प्रकरणीं तडजोड व्हावी म्हणून हा ठराव त्यांनीं पुढें आणला असावा असें आम्हास मुळींच वाटत नाहीं. देवस्थान कमीटी हा देखील ठराव पास करणार नाहीं हें त्याना माहीत असावें, तेव्हां तिच्याकडून तो राजरोसपणे अमान्य करून घेऊन तिला Tara टाकण्याचा त्यांचा विचार असावा असा आमचा तर्क आहे. कारण तसें झाल्यानें सत्याग्रह करूं नका, असें सांगण्याला कमीटीला मुळीं तोंडच हात नाहीं. तेव्हां हा तडजोडीचा ठराव पुढें आणल्यानें एकंदरींत
डब्ल्यू-२०७३-१९ ब