समतेचा झगड्यांत . . . प्रगतीचा मार्ग २९१ आपला फायदाच आहे, असें वाटल्यावरून त्यांनीं अशापरी नमते घेतले असावें. अस्पृश्यांच्या सुदैवानें आतां तो डाव साधला आहे. तेव्हां या बाबतीत होणाऱ्या सत्याग्रहाच्या पूर्वतयारीस सर्वांनी लागावें व तो यशस्वी करून दाखवावा, हेंच एक करण्यासारखे कार्य अमरावती येथील अस्पृश्यांच्यापुढें असलें पाहिजे.
आजकालचे प्रश्न : बहिष्कृत भारत, ता. ३० सप्टेंबर १९२७.