तर ते आपल्या माणुसकीची आपणच माती करीत आहेत. कोणीही त्यांचा धिक्कारच करील. - Page 336

६७

, . , तर ते आपल्या माणुसकीची आपणच [माती ]

करीत आहेत, कोणीही त्यांचा धिक्कारच करील

अमरावती येथील मांग लोक कदाचित्‌ या सत्याग्रहांत भाग घेणार नाहींत असें वाटतें. कारण तेथील कांहीं मांग गृहस्थांनीं पुढील प्रकारचें एक पत्रक अमरावती येथें प्रसिद्ध होणाऱ्या “ उदय “ पत्रांत प्रसिद्ध केलें आहे. " ता. २८ च्या येथील अस्पृश्यांच्या जाहीर सभेंत वाटलेलें एक हस्तपत्रक :--सर्व अमरावती नगरवासी लोकांस आम्ही खाली सह्या करणारे सदई मांगलोकांकडून जाहीर विनंतीनें कळविण्यांत येतें कीं, येथील पुढारी महार लोकांनीं जाती सुधारण्यासंबंधाने आमच्या सर्व मांगलोकांच्या सह्या घेतल्या आणि त्याप्रमाणे आम्ही लोक गणेश थियटरमध्यें सभेला गेलों होतों. परंतु तेंथें जातीचा कांहीएक संबंध नसून तेथें : दुसराच विषय निघाला. तो असा कीं, श्रीअंबेच्या देवळांत जाऊन दर्शन घ्यावें असें कळलें, त्यावरून आजपर्यंत सनातन धर्म जो चालत आलेला आहे त्या धर्मास धक्का पोहोंचतो. या कारणानें त्या सभेचा जो निश्चय होता तो आम्हास मंजूर नाहीं. आम्ही सदह मांगलोक वाडवडिलांपासून वागत आलेल्या धर्माप्रमाणें आम्ही वागण्यास तयार आहों. वरील महार लोकांनी आमच्या ज्या सह्या धोक्यांनें घेतल्या त्या अगदीं खोट्या आहेत. ”

दुःखाची गोष्ट आहे कीं, हिंदुस्थानांतील स्पृश्यलोकांनाच काय पण साऱ्या जगांतील लोकांना अस्पृश्यतेपासून होणाऱ्या अन्यायाची चीड उत्पन्न झाली असतां, भंगीखेरीजकरून सर्वांकडून हीन लेखण्यांत येत असलेल्या मांग जातींतील कांहीं लोकांनीं आपल्या वडिलांना ज्या परी वागविण्यांत आलें तशांच प्रकारची वागणूक खपवून घेण्यास आपण तयार आहोंत असें आपल्या तोंडानें कबूल करणे ही मोठ्याच खेदाची गोष्ट आहे. मांग लोकाच्या हातून हा घडलेला प्रकार स्वयंप्रेरणेने झाला असेल असें आम्हांस वाटत नाहीं. अस्पृश्यवर्ग अगदी अधोगतीस गेलेला आहे ही गोष्ट खरी. पण ज्यांना आपल्या अधोगतीची जाणीव नाहीं असे अज्ञानी लोक फारच थोडे सांपडतील, असें म्हणण्यास कांहींच हरकत नाहीं. deat वरील प्रकारचें आपल्या मानवी हक्काचें बेचनखत बिन मागतां पाठीस लावून देणारे कांहीं लोक अस्पृश्य वर्गांत सांपडले तर ते परप्रेरणेनेंच वागत असावेत असा संशय घेणें सर्वथा निष्कारण होणार नाहीं. तथापि तात्पुरत्या स्वार्थाला बळी पडून कायमच्या हितास आपण मुकतों आहोंत यांची जाणीव असूनहि तात्पुरत्या स्वार्थासाठीं स्वतःस विकणारे लोक अस्पृश्यात सांपडणार