तर ते आपल्या माणुसकीची आपणच माती करीत आहेत. कोणीही त्यांचा धिक्कारच करील. - Page 337

. - . तर ते आपल्या . . . धिक्कारच करील २९३

नाहींत असें आमच्यानें म्हणवत नाहीं. ज्या मांग लोकांनीं वरील पत्रकावर सह्या

केलेल्या आहेत ते लोक अशा कोटींतले असतील तर ते स्वयंप्रेरणेने वागून आपल्या माणुसकीची आपणच माती करीत आहेत, हें पाहून कोणीहि त्यांचा धिक्कारच करील.

या दोहोंपैकी कोणतीहि गोष्ट खरी असली तरी मांग लोक अंबादेवीच्या सत्याग्रहांत भाग घेणार नाहींत म्हणून तो सत्याग्रह थोपवून धरण्यांचे कांहींच कारण नाहीं. सत्याग्रहाच्या परिपूर्ततेस लागणारें बळ सत्याग्रह करणारांच्या निश्चयावर अवलंबून आहे. त्यांच्या समुच्चयावर अवलंबून नाही. कोणताहि सत्याग्रह तो करणारे लोक कितीहि अल्पसंख्यांक असले तरी त्यांना तडीस नेतां येणें शक्‍य आहे. मात्र त्यांचा निश्चय दृढ असला पाहिजे. म्हणून अमरावतीकर अस्पृश्यांना आमची अशी सूचना आहे कीं, सर्व अस्पृश्यांची एकजूट होऊन जर ते सत्याग्रहांस सामील झाले तर त्यासारखी आनंदाची गोष्ट नाहीं. पण तसें नच झालें व कांहीं जण रुसवा फुगवा धरून किंवा सत्याग्रहाचे महत्त्व न पटून त्यांनीं सत्याग्रहांत सामील होण्याचें नाकारलें, तर ज्यांना सत्याग्रह करावयाचा आहे, त्यांनीं जे करूं इच्छीत नाहींत त्यांची वाट पहात बसूं नये. काळ चालला आहे, त्याबरोबर कार्य करीत रहाणें अत्यंत जरूर आहे, हें अस्पृश्यांनीं विसरतां कामा नये.

ब्राह्मण्य हें ठेचलेच पाहिजे मग कोठेही असो

अमरावती येथील मांग लोकांचें जाहीरपत्रक वाचलें व गेल्या महिन्यांत मुंबई इलाख्यांतील मांग लोकांनी महारांतील ब्राह्मण्याविरुद्ध दोन ठिकाणांहून जो निषेध केला तो ध्यानांत घेतला म्हणजे एकाबद्दल जसा धिक्कार वाटतो तशी दुसऱ्याबद्दल धन्यता वाटते. हा निषेध जाहीर करतांना तो जाहीर करणाऱ्या मांग लोकाचा हेतू महारांचे डोळे उघडावयाचे एवढाच जर असता तर आम्हांस आनंद वाटला असता. परंतु त्यांचा हेतू तसा नाहीं असें आम्हांस वाटतें. कारण महार लोकांकडे काय तो आपल्या निषेधाचा रोंख आहे अशी जर त्यांची भावना असती तर वब्हाडांतील कट्टर ब्राह्मणीं पत्रांत तो निषेध प्रसिद्ध न होतां अस्पृश्य वर्गांत जीं पत्रें साधारणपणें खपतात त्यांतच तो प्रसिद्ध करण्यांत आला असता. परंतु निषेध करणारांचा उद्देश महारांना जागें करण्याचा नसून स्पृश्य लोकांना महारांच्या विरुद्ध एक सबब साधून द्यावी असाच मुख्य हेतू असल्यामुळें आम्हांला त्यांचा विषाद वाटतो. तथापि ब्राह्मण्य हें ठेंचलेंच पाहिजे मग तें कोठेंही असो असें आमचें मत असल्यामुळें महारांतील ब्राह्मण्याचा निषेध करणाऱ्या मांग लोकांचे ` आम्ही अभिनंदन करितों.