तर ते आपल्या माणुसकीची आपणच माती करीत आहेत. कोणीही त्यांचा धिक्कारच करील. - Page 338

आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन २९४

संगनमत करणाऱ्या अस्पृश्यपुढाऱ्याशी असहकार ब्राह्मण्यग्रस्त लोकांशी

आहे याचा विचार केला असतां ज्या महार हा निषेध कितपत यथायोग्य

अपराधी आहेत असें लोकांविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे ते महार लोक

आम्हांस दिसत नाहीं. या दोन तक्रारीपैकीं पहिली तक्रार रा. के. के. सकट यांची आहे. त्यांच्या तक्रारीचा मतितार्थ असा आहे कीं, ते ता. २८-८-१९२७ रोजीं पुणे येथील कामाठीपुऱ्यांतील महार लोकाच्या मरीआईच्या देवळांत त्यांना महार लोकांनी प्रवेश करूं दिला नाही. महार लोकांनी रा. सकट यांना देवळांत न घेतल्याबद्दल फारच वाईट वाटलें असें ते म्हणातात. त्यांच्या दु:खाचे आम्ही वाटेकरी आहोंत याबद्दल त्यांनीं खात्री बाळगावी. परंतु या बाबतींत विशेष काहीं करितां येईल असें वाटत नाहीं. कारण या बाबतींत आम्हीं जी चौकशी केली आहे त्यावरून आम्हांस असें दिसून आलें कीं, देवळांतील बंदी ही फक्त रा. सकटांपुरतीच आहे. ती सर्व मांग लोकांस लागू नाही. ज्या लोकांनीं रा.

सकट यांना मरी आईच्या देवळांत येण्यास बंदी केली त्या लोकांचें असें म्हणणें आहे कीं, आम्ही कोणाही मांगाला घेऊं; पण सकटांना घेणार नाहीं. अशा प्रकारचा पक्षपात करण्याचें कारण जे त्यांनीं दिले तें रा. सकट यांनी ध्यानांत ठेवण्यासारखें आहे. तें कारण असें कीं, जो मांगाचा पुढारी ब्राह्मण्यग्रस्त

लोकांशीं संगनमत करितो, त्यांच्या तंत्रानें वागतो, व महारांतील किंवा चांभारांतील उणे दुणे काढून ब्राह्मणांना भर देतो तो आमचा आहे असें आम्ही कबूल करणार नाहीं: व त्याला आम्ही आपल्या देवळांत घेणार नाहीं. विचारसरणी सत्य

असल्याकारणानें रा. सकट यांनीं कितीही सांगितलें तरी तिचा आमच्यानें निषेध होणें शक्‍य नाहीं. उलट रा. सकट यांना आम्हीं असें सुचवीतों कीं, तुमच्या वरचा हा आरोप तुम्ही धूवून काढा व उजळ माथ्याने मरीआईच्या देवळांत येऊ देण्याची मागणी करा. मग महार लोक जसे इतर मांग लोकांना देवळांत घेण्यास तयार

आहेत तसें तुम्हांस घेण्यासही ते तयार होतील.

|. आपल्यांतील ब्राह्मण्य मिरविण्याचा उपक्रम करूं नये

दुसरी तक्रार लोणावळें येथील मांग लोकांची आहे. तींत महार लोकांवर

केलेला आरोप असा आहे कीं, महार लोकांनीं लोणावळें येथील चहाच्या हॉटेलच्या

मालकास मांग लोकांस हॉटेलांत येण्याचें बंद करण्यास भाग पाडलें. ज्या

लोकांनीं ही तक्रार प्रसिद्ध केली आहे त्या लोकांनीं जे महार लोक एके काळीं कोणत्याही प्रकारचा वीट न मानितां एकाच कपबशींतून एकाच टेबलावर बसून चहापान करीत असत तेच महार लोक एकदम बिथरून जाऊन जुनी वहिवाट

मोडून आपल्याला मांगाचा विटाळ होतो असें म्हणण्यार उद्युक्त झाले याचें कारण