तर ते आपल्या माणुसकीची आपणच माती करीत आहेत. कोणीही त्यांचा धिक्कारच करील. - Page 339

, . - तर ते आपल्या . . . धिक्कारच करील २९५

काय ? हें त्यांनीं जाहीर केलें असतें तर या बाबतींत खरा दोषं कोणाच्या पदरीं येतो हें ठरविण्यास सोपें गेलें असतें. पुण्याच्या प्रकरणांत तसेंच लोणावळें येथील प्रकरणांत आम्हास जेवढी चौकशी करितां आली तेवढी आम्हीं केली. व त्यावरून लोणावळें येथील महार मांगांमध्यें हा बेबनाव उत्पन्न करण्यास कांहीं मांग पुढाऱ्यांचा बेवकूबपणाच कारणीभूत झाला आहे. एके काळीं लोणावळें येथील महार मांगांत चांगली एकी होती; व ती दिवसेंदिवस दृढतर होत होती. इतकी कीं, महार लोक सार्वजनिक प्रसंगांत मांग लोकांना आमंत्रणें देऊन त्यांच्याशी सहपान करीत असत. परंतु दुधांत मिठाचा खडा पडावा याप्रमाणें मांगांतले कोणी पुढारी लोणावळ्यास येवून या एकीची बेकी करून चालते झाले. त्यांनीं लोणावळें येथील आपल्या जातभाईस अशी शिकवण दिली कीं, मांगांनीं महाराचे

Bad खाऊं नये. इतकेंच नव्हे तर हा नियम पाळण्याबद्दल मांग लोकांना त्यांनीं

शपथाही दिल्या. याचा परिणाम असा झाला कीं, महारांच्या हातचें खाल्लें तर आमची जात आम्हांला Grad. अशा जाहीर सबबीवर मांग लोक महारांनी दिलेलीं आमंत्रणें नाकारू लागले. मांग लोक आपणाला अशा परीनें तुच्छ लेखतात याचा महार लोकांना विषाद वाटणें अगदीं साहजीक आहे; म्हणून मांग लोकास चहाच्या दुकानांत बंदी करण्याचा जो त्यांनीं घाट घातला त्याला या चिडवाचिडवीशिवाय दुसरें कोणतेंच कारण संभवत नाहीं. अशा परिस्थितींत मांग लोकांना दोन व्यवहाराच्या गोष्टी सांगण्यापलीकडे आमचें कांहीं विशेष कर्तव्य आहे असें आम्हांस वाटत नाहीं. व त्या व्यवहाराच्या गोष्टी ह्याच कीं, ज्या मांग लोकांना महारांतील ब्राह्मण्य लयास जावें असें वाटत असेल त्यांनीं आपल्यांतील ब्राह्मण्य मिरविण्याचा उपक्रम करूं नये.

en

आजकालचे प्रश्न : बहिष्कृत भारत, ता. ३० सप्टेंबर १९२७.