६८
एकाची माणूसकी अमान्य तर
दुसर्याची माणूसकी मान्य
हिंदु महासभा हें कशा प्रकारचें थोतांड आहे हें आम्ही अनेक वेळां लोकांच्या निदर्शनास आणून दिलें आहे. वर्णव्यवस्था कायम ठेवून हिंदु संघटन करूं पाहणाऱ्या या अजागळ कंपूस आपल्या प्रयत्नाच्या विफलपणाचा कियास होऊ नये ही तर आश्चर्याची गोष्ट आहेच. पण त्यांच्या नादानपणाची समज शुद्धी करून घेऊन परधर्मातून हिंदु धर्मांत येऊं इच्छिणाऱ्या महामूर्खांना होऊं नये ही त्याच्याहिपेक्षां आश्चर्याची गोष्ट आहे. हिंदु सभेच्या हुलकावणीस फसून परधर्मातून हिंदु धर्मात आलेल्या लोकांची कशी फजीती होते याची दोन उदाहरणें
आज दुसरीकडे छापलेल्या पत्रव्यवहारांतौ वाचावयास सांपडतील. रा. नायडू
हे ख्रिस्ती होण्यापूर्वी स्पृश्य हिंदूंपैकी एक होते. हिंदुधर्मात परत आल्यानंतर आपले आप्त इष्ट जूनी ओळख देऊन आपल्याशीं व्यवहार करतील अशी आशा धरून त्यांनी आपलें शुद्धिकरण करून घेतलें. परंतु त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांच्या जुन्या आप्तांनी त्यांच्याशीं स्नेह संबंध केला नाहीं. म्हणून अशा प्रकारच्या स्नेहाच्या अभावीं आपलें जीवित कष्टमय करून घेण्याऐवजीं आपल्या पूर्वीच्या एकवर्णी खिस्ती धर्मात जाणें बरें असें वाटून त्यांनी हिंदुधर्माचा त्याग केला. तथापि आले तसेंच हिंदु धर्मात राहिले असते तरी त्यांची विशेष हानी झाली नसती. कारण स्पृश्य हिंदु व खिस्ती यांच्या सामाजिक दर्जात कांही फरक नाहीं. परंतु हिंदुधर्मीय अस्पृश्य व परधर्मीय खिस्ती यांच्या सामाजिक दर्जात जमीन अस्मानाचें अंतर आहे. एकाची माणूसकी अमान्य तर दुसऱ्याची माणूसकी मान्य. एकाला उन्नतीच्या साऱ्या वाटा बंद तर दुसऱ्याला त्या अगदीं मोकळ्या. असें असताना खिस्ती या नात्याने उच्च पद भोगीत असलेल्या माणसानें हिंदु होऊन महारांच्या पंक्तीला येऊन बसावे याचा आम्हास विस्मय वाटतो. रा. विश्वास हे कांही अज्ञान गृहस्थ नाहीत. त्यांना हिदुधर्मात अस्पृश्यांची काय दुर्दशा आहे हें माहित नाही असें म्हणतां यावयाचे नाही. त्यांनी जें बेवकूफपणाचे कृत्य केलें त्यावरून एक गोष्ट सिद्ध होते की धर्माची उभारणी त्याच्या सामाजिक उपयुक्ततेवर झालेली नाहीं. सामाजिक उपयुक्ततेच्या दृष्टीनें खिस्ती धर्म हिंदु धमपिक्षां कसा श्रेष्ठ आहे
+ पाहा, परिशिष्ट क्रमांक-३०.