एकाची माणूसकी . . . माणूसकी मान्य २९७
याची जाणीव रा. विश्वास यांना असती तर त्यांनी खिस्ती धर्मातून हिंदु धर्मात कोलांटी उडी मारून आलेच नसते. आतां प्रचीती आल्यानंतर तरी रा. विश्वास हे निमूटपणें खिस्ती धर्मात परत जातील अशी आम्हांस आशा आहे. त्यांच्या उदाहरणाने परधर्मात गेलेले अस्पृश्य हिंदुमहासभेच्या शुद्धिकरणाच्या फसवेगिरीपासून सावध राहतील ही त्यांतल्यात्यांत आनंदाची गोष्ट आहे.
renee
आजकालचे प्रश्न : बहिष्कृत भारत, ता. ४ नोव्हेंबर १९२७.