धर्मांतर केल्याशिवाय अस्पृश्यांना आपला दर्जा वाढवून घेण्यास वाव नाही - Page 343

धर्मातर केल्याशिवाय . . . वाव नाही २९९

नसले तरी त्यांच्या धोरणाने वागणारे आहे. तसें जर नसतें तर रा. आठवले यांस ते अस्पृश्यांना जागृत करतात येवढ्याच अपराधावरून पोलीसांनी त्यांना ' बिनधोक मारलें नसतें. स्पृश्य हिंदुसमाज अस्पृश्यांना सुखाने, ऐष आरामानें नांदु देत नसेल तर त्यांनी परधर्माचा अवलंब करावा हेंच बरें. अस्पृश्यांना स्पृश्य लोक कांकणभर देखील इतमामानें राहूं देत नाहींत याचे कारण हिंदु धर्मात अस्पृश्यांचा दर्जा खालचा आहे. दर्जा वाढल्याखेरीज अस्पृश्यांना स्पृश्याप्रमाणें वागू दिलें जाणार नाहीं आणि धर्मांतर केल्याशिवाय अस्पृश्यांना आपला दर्जा वाढवून घेण्यास मार्ग नाहीं. तेव्हां या मेघवाल लोकांनी वऱहाडांतील रा. भिमसन

व रा. सूर्यभान यांनी मनांत आणल्याप्रमाणें धर्मांतर करावें याशिवाय दुसरा सल्ला

आम्ही काय देणार ?

आजकालचे प्रश्‍न : बहिष्कृत भारत, ता. ४ नोव्हेबर १९२७.