७०
चातुर्वर्णाला कंटाळलेल्या अस्पृश्यांस एकवर्णी धर्मात
गेल्याशिवाय गत्यंतर नाही
अस्पृश्यांनी धर्मांतर करूनहि हिंदु धर्म त्यांना अजीबाद मुकणार नाहीं अशा प्रकारची व्यवस्था आर्य समाजांत होती. आर्य समाज ही ज्यांत ब्राह्मण्य नाहीं अशी हिंदुधर्माची एक सुधारलेली आवृत्ती आहे. व मुसलमान वगैरे परधर्मीय लोकांचाहि तशाच प्रकारचा समज आहे. आर्यसमाज हा हिंदुसमाजांतील चातुर्वर्ण मोडून त्याला एकवर्णी करण्याकरितां जन्मास आलेला पंथ आहे. त्याची धडाडीहि विलक्षण आहे. इतकी कीं मुसलमानांसारखे परधर्मी लोक त्यापुढें गांगरून जातात. परंतु अलीकडे चातुर्वर्णी हिंदुंना शुद्ध करून आर्यसमाजांत घेण्याकडे त्याचे दुर्लक्ष झालें आहे. व परधर्मी लोकांना शुद्ध करून हिंदु करण्याकडे या समाजाचे विशेष जोरानें प्रयत्न होऊ लागले आहेत. आर्यसमाजांत व हिंदुमहासभेंत एकेकाळी ध्येयाच्या दृष्टीनें एक मोठें अंतर असें. परकीयांच्या हल्ल्यापासून हिंदुधर्माचा बचाव करण्यास त्याला एकवर्णी केलें पाहिजे असा हिंदुसमाजाविरूद्ध आर्य समाजाचा कटाक्ष असे. हिंदुमहासभेचा सारा कटाक्ष परधर्मीयांकडे असून हिंदूंचे चातुर्वर्ण्यं कायम dead YS हिंदूंचे संख्याबल वाढवावे असा आहे. या दोन दृष्टिकोनांतील अंतर महत्त्वाचें आहे. परंतु मुसलमानांचा मारा आर्य समाजावर व हिंदुमहासभेवर सारख्याच परीनें होत असल्या कारणानें आर्य समाज हिंदुसमाजास एकवर्णी करण्याचें आपलें मूळकाम विसरून हिंदुमहासभेप्रमाणेंच शुद्धीकरणाच्या मागे लागला आहे. आता या दोघांची गट्टी इतकी घट्ट जमली आहे की हिंदुमहासभेचे ध्येय आर्यसमाजाचेंहि ध्येय बनले आहे, हें अमरावती येथें ता. ६ ऑक्टोबर रोजी भरलेल्या आर्यधर्म परिषदेने चातुर्वर्णाला मान्यता दर्शविणारा ठराव पास केला यावरून उघड होत आहे. तो ठराव जरी गुणभेदाच्या चातुर्वर्णासंबंधी असला तरी ब्राह्मणांप्रमाणें आहे तो वर्णभेद गुणभेदानुरूपच आहे असा युक्तिवाद करण्यास आर्यसमाजिष्ट लोकांस फारसा अवधी लागणार नाहीं असें आम्हांस वाटतें, हिंदुमहासभेने आर्यसमाजाला आपलेसे करून आपसांतला विरोध मोडून टाकला याबद्दल तिला आनंद होत