चातुर्वर्णाला कंटाळलेल्या अस्पृश्यांस एकवर्णी धर्मात गेल्याशिवाय गत्यंतर नाही. - Page 345

चावुर्वर्णाला कंटाळलेल्या . . . गत्यंतर नाही . ३०१

असेल. परंतु हिंदुसमाजानें आपल्या पोटांत किंवा आपल्यास जोडून जर एकवर्णी व्यवस्था केली नाही किंवा आर्यसमाजासारखी असलेली मोडून टाकिली तर चातुर्वर्णाला कंटाळलेले अस्पृश्य लोकांस हिंदुधर्माशीं कांहीं संबंध नसलेल्या खिस्ती किंवा मुसलमानी धर्मासारख्या एकवर्णी धर्मांत गेल्याशिवाय गत्यंतर उरणार नाहीं हें हिंदुमहासभेनें अथवा आर्यसमाजानें विसरू नये. आर्य समाजानें हिंदुमहासभेला बळी पडण्याऐवजीं तिला आत्मसात करून घेणें यांत आर्यसमाजाच्या कार्याची पूर्तता आहे; इतकेंच नव्हे तर हिंदुसमाजाचा व हिंदुधर्माचा बचाव आहे असें आम्हांस वाटतें.

आजकालचे प्रश्‍न : बहिष्कृत भारत, ता. ४ नोव्हेंबर १९२७.