७१
seen वगेरे सांप्रदायाप्रमाणे ब्राह्मण्य हा
एक सांप्रदाय आहे
अलीकडे मुंबईच्या म्युनिसिपल कार्पोरेशनच्या स्कूल्स कमेटीच्या एकंदर वागणुकी व वातावरणाकडे पाहिलें तर अजूनपर्यंत कार्पोरेशनच्या कोणत्याही स्वाभिमानी सभासदाने ह्या कमेटीवर निंदाव्यंजक ठराव कसा आणला नाहीं ह्याचेच आश्चर्य वाटतें. कॉर्पोरेशनच्या बहुतेक ठरावांना जवळ जवळ धाब्यावर बसविण्याचा जणूं काय ह्या कमेटीनें विडां उचलला आहे असें दिसतें. कमेटीच्या ह्या असल्या अरेरावी वर्तणुकीची फक्त शाब्दीक चर्चा मधून मधून मुंबई म्युनिसिपल कार्पोरेशनमध्ये होत असते. पण कार्पोरेशनची सभा संपल्यावर जिकडे तिकडे परत शांत व म्हणूनच कार्पोरेशननें ठराव केला असतांही दादर येथील मुलींची शाळा स्कुल कमेटीचे सभासद डॉ. जावळे यांच्याच बंगल्यात अजूनही बेधडक राहूं शकते. असल्याच प्रकारचा "अस्पृश्यां” बद्दल ह्या कमेटीच्या ताब्यांत असलेल्या शाळांमध्ये कसल्या प्रकारचा अन्याय होत आहे हें ता. १८ ऑक्टोबर १९२७ च्या स्कूल कमेटीच्या चर्चेवरून चांगलेंच ध्यानांत येऊं शकतें. स्पर्शास्पर्श भेद बाजूला सारून मुंबईच्या म्युनिसिपल कार्पोरेशनच्या ताब्यांतील प्रत्येक शाळांत कोणासही मज्जाव नसावा, व शिक्षणाचा उपयोग सर्वांस सारखा मिळावा म्हणून गेल्या वर्षी एक ठराव पास केला होता. तसेंच एफ् आणि जी वार्डात सक्तीचें शिक्षण झाल्यापासून प्रत्येकांस आपली मुलें कोणत्या ना कोणत्या शाळांत पाठविणे भाग पडत आहे. अशा स्थितींत आपल्या ठरावाची कुठपर्यंत अम्मलबजावणी होते हें पाहणें कार्पोरेशनचे काम होतें. परंतु तें त्यांच्याकडून नीट रीतीनें होत नसावे असें अनुमान काढणें काहीं चुकीचें होणार नाहीं. ता. १८ च्या स्कूल्स कमेटीच्या चर्चेवरून ''लोटीबंदी'' सांप्रदायाची येथें चांगलीच वर्णी लागली असें दिसून आल्याशिवाय राहत नाहीं. कमेटीच्या शाळांमधून स्पृश्यांकरितां निराळे लोटे “अस्पृश्यां* करितां अगदीं निराळे लोटे (हे पितळीचे तरी आहेत कां? नाहींतर '"'स्पृश्य'' पितळीचे वापरतात तर अस्पृश्यांच्या नशिबीं टिन पाँट्स) ठेवण्यांत आलेले असून त्यांचा उपयोग अगदी त्यांनीच करावयाचा. कार्पोरेशननें गेल्या वर्षी ठराव केला होता की आपल्या शाळेंत कोणत्याहि प्रकारचा भेदभाव पाळण्यांत येऊं नये. कार्पोरेशनच्या ठरावाची पूर्णपणें अंमलबजावणी करणें हें स्कूल कमेटीचें कर्तव्य