. , . वगैरे सांप्रदायाप्रमाणें . . . सांप्रदाय आहे ३०३
आहें हें श्री. जमनादास मेथा व मि. बोमन बेहराम ह्यांनी कमेटीच्या निदर्शनास आणिलें परंतु लोकमताच्या नांवाखाली आपला सोंवळेपणा झाकून घेण्यासाठीं श्री. पारेख, डॉ. जावळे, श्री. दळवी ह्यांची जीं भाषणें झाली, त्यावरून हे लोक स्पृश्य लोकांना अस्पृश्यांचा विटाळ होवूं नये म्हणून जी दक्षता बाळगतात ती खरोखरच त्यांच्या दृष्टीने वाखाणण्यासारखी नाहीं असें कोण म्हणेल ? हिंदु-मुसलमानांची एकी करावयास सरसावलेले श्री. दळवी ह्यांनीं तर आपल्या सोंवळेपणास कायद्याची जोड देऊन तें कसें “सोंवळे'” असू शकतें हें दाखविण्याचा प्रयत्न केला. ज्या कायद्याची भीति ह्या सद्गृहस्थांनीं दाखविली तो कायदा तरी कोणता हें मात्र त्यांनीं दाखविलें नाहीं. स्कूल्स कमेटीवर “ स्पृश्य लोक “ कोणत्या कायद्याच्या कोणत्या कलमाखाली फिर्याद लावतील हें दाखविण्याची तसदी जर श्री. दळवी ह्यांनी घेतली असती तर “'स्पृश्यां “ चे वकिलीला जाणारे पैसे तरी वांचले असतें व त्यांनीं तडक कोर्टाकडे धांव ठोकली असती. शाळेसारख्या सरस्वतीच्या पवित्र मंदिरांत माणुसकीस लज्जास्पद असलेला पक्षभेद फक्त ह्या हिंदुस्थानांतच जिवंत दिसूं शकतो व राहूं शकतो. ज्या समाजांच्या व्यक्तींमध्ये माणुसकीस वाव नाहीं, त्यांनीं स्वातंत्र्यरूपी माणुसकीचे हकक मिळवावयास निघणे म्हणजे ae एकपातिव्रत मिळविण्यासाठी निघण्यासारखें हास्यास्पद व उपहासात्मक होय. डॉ. जावळे, दळवी प्रभुतींना व त्यांच्याच विचारांच्या इतर स्पृश्य बांधवांना जर समतेच्या तत्वांवर आपलीं मुलें म्युनिसिपालटीच्या शाळांमधून पाठवावयाची नसतील तर खुशाल त्यांनी त्यांना घरी पोसावें अथवा खुशाल निराळ्या शाळा काढून आपणांस “ अस्पृश्य “ बनवून घ्यावे. समतेच्या तत्त्वावर जगण्याचा, वागण्याचा, राहण्याचा हा प्रत्येक माणसास हक्क आहे व त्याप्रमाणे .-त्यानें तो बजाविला पाहिजे व आमच्या अस्पृश्य बांधवांनीं तो बजावून घेण्यास बिलकूल डगमगता कामा नये. श्री. जमनादास मेथा ह्यांनी म्हटल्याप्रमाणे परकीय गौरकाय पंचमाशीं सहकार्य व खानपान करावयास ज्यांना लाजलज्जा वाटत नाहीं, असल्या लोकांनी आपल्या देशबांधवांशीं अशाप्रकारची वागणूक अझूनही ठेवून लोकहितवादाच्या गोष्टी बोलणें म्हणजे आपल्या उलट्या काळजाची प्रचीति दाखविण्यासारखें होय. आमच्या ह्या लोकहितवाद्यांना इतकेंच सांगावयाचें कीं, आपल्या ह्या लोकहितवादाचा सांवळा गोंधळ झाला तेवढा पुरे. आतां जर समतेची भाषा व कृती नसेल तर खुशाल घरीं स्वहितवाद करीत बसा. आजकाल लोक आपलें हित पाहण्यास पूर्णपणे समर्थ आहेत. हा “ लोटीबंदीचा “ ठराव पुन्हा विचारार्थ एका कमेटीकडे सोंपविण्यात आलेला आहे. त्याचा काय निकाल होतो पहावा. तुर्त इतकेंच सांगितले म्हणजे पूरे कीं लोटीबंदी वाले भालाकार देखील “ गोविंद “ “ गोविंद ” म्हणून कां होईना