महार वतनाचा कायदा व त्यात सुचविलेल्या दुरुस्त्यांचे स्पष्टीकरण. - Page 349

७२
महार वतनाचा कायदा व त्यांत सुचविलेल्या
दुरुस्त्याचे स्पष्टीकरण

गेल्या तीन अंकात “ महार आणि त्यांचे वतन “ या मथळ्या खालीं तीन अग्रलेख आम्हीं लिहिले. त्यांत महार वतनापासून महार लोकांचा कसा तोटा होतो व त्यांत कोणत्या प्रकारची दुरुस्ती करणें आवश्यक आहे, याचें जरी आम्ही सांगोपांग विवेचन केले होतें तरी आम्ही तयार केलेल्या योजनेत ज्यांना जे फेरफार करावेसे वाटतील त्यांनी आपल्या सूचना आमच्याकडे पाठवाव्यात अशी आम्ही जाहीर विनंति केली होती. आमच्याकडे या बाबतींत काय काय सूचना येतात याची आम्ही वाट पहात बसलों असतां अचानक मुंबईत दोन सभा भरविण्यात आल्याचे व त्यांत आमच्या योजनेविरुद्ध ठराव पास केल्याचे वृत्तपत्रांतून जाहीर झालें ! ! सुधारणा सुचविण्याऐवजी एकदम विरोध करणारा ठराव सभांतून पास झाल्याचें जेव्हां आम्ही ऐकिलें तेव्हां आम्हांस थोडेसें आश्चर्य वाटलें. परंतु या सभा तरी कोणी भरविल्या याचा ठाव शोधून काढण्याचा प्रश्‍न जेंव्हा आम्ही केला, तेंव्हा आम्हांस असें दिसून आलें की, या सभाच आमच्या विरोधी पक्षानें भरविल्या होत्या. अर्थात अशा सभांतून विरुद्ध ठराव पास होणें अगदीं स्वाभाविक आहे. शिवाय या सभांतून फक्त एकच सभा जाहीरपणे भरविण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, व दुसरी जाहीरपणे न भरवितां दाराच्या आंतच भरविण्यांत आली होती असें म्हणतात. व पहिलीहि जरी जाहीरपणे भरविण्यांत आली होती, तरी ती शेवटीं हजर असलेल्या लोकांनी उधळून लावून दिल्यानंतर कोणाच्या तरी खासगी जागेंत अध्यक्ष व त्यांचे अनुयायी एवढ्यांनीच जमून तिच्यांत जो ठराव पास करावा असें त्यांना वाटत होते तो पास करण्यांत आला. अशाप्रकारच्या चोरट्या सभांना महत्व कोणीच देऊं शकणार नाही. या दोन्ही सभेच्या अध्यक्षांना वतनाचा मुळी परिचय नाही. एकाचा व्यवसाय गंडे दोरे देण्याचा, वेसकराची काठी याच्या कैक पिढ्या झाल्या, गेलेली ! त्याच काठीच्या झपाट्याने जशी वेसकराची कधीं काळीं पाठ शेकली जाते तशी ज्याची कधीं शेकली गेली नाहीं, तो म्हारकी नको असें कशाला म्हणेल ? दुसरा अध्यक्ष कोण हें त्याच्या नांवावरून ओळखींता येत नाहीं. तो लक्षचौन्यांशीचे फेरे करणाऱ्या जीवात्म्याप्रमाणे साऱ्या शहरास खालीं फेरे घालीत फिरणारा मोटारवाला आहे असें म्हणतात. यांपैकीं एकानेही आपल्या बापाच्या हातची

डब्ल्यू-२०७३-२० अ