महार वतनाचा कायदा व त्यात सुचविलेल्या दुरुस्त्यांचे स्पष्टीकरण. - Page 353

महार वतनाचा कायदा . . . दुरुस्त्यांचें स्पष्टीकरण ३०९

दुसरा हेतू आहे त्याच्या परिपूर्णतेसाठी दोन जादा कलमें वतन कायद्यातील १९ व्या कलमास जोडण्यांत यावींत असें आम्ही सुचविलें आहे. या दोन जोड कलमानुसार महारांना वाटल्यास बलुत्याचें रूपांतर नकदींत करून घेण्याचा हक्क त्यांना देण्यांत आला आहे. या व्यवस्थेमुळे रयतेवर जसा लोकल सेस बसविला जातो तसा बलुत्याच्या ऐवजी महारकी सेस बसविला जाईल. अशा प्रकारची व्यवस्था झाली म्हणजे रयतेनें महारांना काय द्यावयाचें व महारांनी रयतेपासून काय मागावयाचें हें एकदांचे निश्चित होऊन जाईल. ही तजवीज करण्याचें कारण असें कीं आमच्या योजनेंत बलुत्याचा हक्क महारांचा महारांनी बजावण्याऐवजी सरकारतर्फे त्याची अंमलबजावणी होऊन महारांचा हक्क पूर्णपणे त्यांच्या पदरांत पडावा. परंतु बलुत्याची उगरणी सरकारतर्फे व्हावी ही गोष्ट जर आवश्यक असेल तर या हक्कांचे रुपांतर नकदीत झालेंच पाहिजे. त्याशिवाय सरकार ही उकलती आपल्या अंगावर घेणार नाही, व ती सरकारवर लादणेंहि योग्य होणार नाहीं. यास्तव बलुत्याचें रुपांतर नगदींत होणें महार लोकांच्या हिताचें आहे. हल्ली बलुतें महारांना खळोखळीं हिंडून उकळावे लागते. कोठें मिळते, कोठें मिळत नाही. आमची सूचना अंमलात आल्यावर ही सारी अनवस्था टळून नेमके जे काही मिळावयाचे तें सरकारी तिजोरींतून नेमक्या वेळी मिळेल. (३) ठराविक बलुत्यांत वेळोवेळीं कारणपरत्वें बढती व्हावी म्हणून वतन कायद्याचे

कलम २१ यांत दुरुस्ती करण्यांत आली आहे. ती ही कीं महारांना बलुते किती

द्यावें या विषयींचा ठराव दहा वर्षांपेक्षा जास्त वर्ष लागू असूं नये. यामुळे निदान दर दहा वर्षांनी महारांना आपलें बलूते वाढवून घेण्याचा अधिकार प्राप्त होईल. (४) ज्यां महारांना रयतेचीं कामें करावयाची नसतील, त्यांना त्यांच्या वतनास धोका न होतां त्यांना तसें करतां यावें हा जो आमच्या योजनेचा तिसरा हेतू आहे तो तडीस जावा यास्तव वतन कायद्याचे कलम १९ यास आणखी दोन ज्यादा कलमांची जोड देण्यांत आली आहे. या दोन जोड कलमांच्या आधारें महार लोकांस वाटल्यास त्यांना बलुत्या ऐवजीं ठरलेल्या महारकी सेसपैकी सरकारी कामाकरितां किती व रयतेच्या कामाकरितां किती याची कलेक्टरकडून विभागणी करून घेण्याचा अधिकार महारांना देण्यांत आला आहे, व अशी विभागणी करून घेतल्यावर ज्या महार लोकांनीं रयतेची कामें करावयाची नसतील त्यांनी रयतेच्या कामासाठी तोडून दिलेला महारकी सेसचा भाग सोडून द्यावा व रयतेच्या कामांतून

आपली सुटका करुन घ्यावी. अशी व्यवस्था करून घेण्यांत आली आहे.

(५) आतां ज्या महार लोकांना सरकारी कामेंही करण्याची इच्छा नाहीं, म्हणजे ज्यांना वतनच सोडून द्यावयाचें आहे अशा लोकांनाही आपली इच्छा सफल करून घेता यावी म्हणून वतनकायद्याच्या १५ व्या कलमांत आम्ही एक दुरुस्ती `