महार वतनाचा कायदा व त्यात सुचविलेल्या दुरुस्त्यांचे स्पष्टीकरण. - Page 355

महार वतनाचा कायदा . . . दुरुस्त्यांचें स्पष्टीकरण ३११

कै. शाहू छत्रपति महाराजा हे कांही महारांचे शत्रु नव्हते. त्यांच्यासारखा सखा अस्पृश्यांना पूर्वी लाभला नव्हता व पुढे लाभेल कीं नाही याबद्दल आम्हास शंकाच आहे. तथापि त्यांना पक्केपणी कळून चुकलें होतें कीं वतनामुळेंच महारांची अधोगती झाली आणि म्हणूनच त्यांनी आपल्या अधिकाराच्या जोरावर कोल्हापूर संस्थानांतील महारांची वतनें जबरदस्तींने खालसा केली. महाराजांनी जेव्हां जबरदस्तीने महारांची वतनें खालसा केली तेव्हां कोल्हापूर संस्थांनांतील महार प्रजेनें त्याला विरोध केला नव्हता असें नाही. कोठेंहि झालें तरी अज्ञ जनता ही जुन्या परंपरेने आंधळी झालेली असते. हातचे, मग तें कितीहि अल्प असो, सोडून पळत्याच्या पाठीं, मग तें कितीहि मोठें असो, लागणें हा धाडसी खेळ जनता कधीं सहज खेळत नाहीं. अमेरिकेतील गोऱ्या लोकांत बहुत वर्षे काळ्या शिद्दी लोकांना गुलामगिरीत ठेवण्याची पद्धत चालू होती. माणसा सारखी माणसें ! त्यांचा बाजारांतील एखाद्या जड वस्तुप्रमाणें क्रयविक्रय व्हावा ही गोष्ट अमेरिकेंतींल कांही सुज्ञ गोऱ्या लोकांना अत्यंत पाप मुलक अशी वाटली व त्यांनी या अमानुष पद्धति विरूद्ध मोहिम सुरू केली. शेवटी अमेरिकेंतील गोऱ्या लोकांत आपापसांतच काळ्या लोकांना गुलामगिरीतून मुक्त करण्याकरिता भयंकर लढाई सुरू झाली व तींत गुलामगिरी चालू ठेवावी असें म्हणणांऱया गोऱ्या लोकांचा पराजय झाला. शेवटी ता. २२ सप्टेंबर सन १८६२ रोजीं सर्व अमेरिकन राष्ट्रांच्या वतीनें त्या वेळचे राष्ट्राचे अधिपति अब्राहम लिंकन यांनी जाहीरनामा काढून व साऱ्या काळ्या RA लोकांची गुलामगिरीतून ता. १ जानेवारी १८६३ पासून मुक्तता करण्यात आली. हा संदेश सर्वत्र पसरल्याबरोबर दरेक गुलामाच्या गोऱ्या मालकाने आपल्या गुलामांना एकत्र करून सांगितले कीं, “ तुम्ही आतां स्वतंत्र झालांत. माझ्याकडे तुम्हांला आतां न्याहारी किंवा जेवण मिळणार नाही तुमचे तुम्ही पहा.” दुर्दैवाची गोष्ट ही की स्वतंत्रतेचा संदेश ऐकून आनंदी झालेले गुलाम आपली जबाबदारी काय हें ऐकल्याबरोबर बिथरून गेले व आपल्याला स्वातंत्र्य देतों म्हणणाऱ्या अब्राहँम लिंकननें आपल्यावर काय अरिष्ट आणलें आहे याची जाणीव होऊन आनंदाच्या ऐवजी त्यांच्या मनांत चीड आली. तशीच गत कोल्हापुरांतील महारांची सुरवातीस झाली होती. तथापि बऱ्या गोष्टीचे बरे परीणाम छपून राहत नाहींत. त्याच न्यायाने वतन नष्ट होणें ही आपल्या हिताची गोष्ट आहे असें कोल्हापूर संस्थानांतील महारांनी अखेर ओळखले व आमची वतने खालसा करावींत असे स्वखुशीनें करवीर सरकारकडे अर्ज केले. जसे अमेरिकेंतील काळ्या लोकांना “तुम्हांला न्याहारी देतों, जेवण देतों, आमचे गुलाम

१ पाहा, परिशिष्ट क्रमांक-३३.

+ पाहा, परिशिष्ट क्रमांक-३४.