ब्राह्मण्याच्या टांचेखाली . . . अस्पृश्यांना विरोध ३१७
निदान या कार्याने ब्राह्मणवर्गाने तरी आपल्यावरची जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला आहे असे त्यांना म्हणतां येईल. ब्राह्मणेतर पुढाऱ्यांनीं मात्र या बाबतींत कांहीच केलें नाहीं. खेडेगांवचे मराठे आदिकरून ब्राह्मणेतर लोक अस्पृश्यांच्या सत्याग्रहाला जोराचा विरोध करण्याच्या तयारीत आहेत अशी ओरड कांनी येत आहे. अशा वेळी जबाबदार मराठा ब्राह्मणेतर पुढाऱ्यांनीं कुलाबा जिल्ह्यांत जाऊन आपल्या ज्ञातिबांधवांची समजूत घालणें अवश्य होते. व जातां येत नसल्यास त्यांनीं ताबडतोब एक खुलासापत्र छापून तें गांवोगांवीं प्रसिद्ध करण्याची व्यवस्था करावयाची होती. ब्राह्मणेतर पक्ष या कार्याकडे दुर्लक्ष करील तर पुढील अनर्थाचे खापर सर्वस्वी त्याच्या माथ्यावर फुटेल, इतकेच नव्हे तर त्या पक्षाबद्दल अस्पृश्य वर्गाचें मत कलुषित झाल्याशिवाय राहणार नाहीं.
आज जो महाड येथे अस्पृश्यांवर प्रसंग आहे तसाच प्रसंग चेऊल येथील
ब्राह्मणेतर जनतेवर आलेला आहे. कारण, महाड येथे अस्पृश्यांस पाणी पिण्यास जाण्यास जशी मनाई करण्यांत आलेली आहे तशीच चेऊल येथील श्री रामेश्वराच्या देवळांत कोळी, भंडारी, आग्री, मराठे, वगैरे ब्राह्मणेतर जनतेस देवळाच्या गाभाऱ्यांत जाण्याची ब्राह्मण ट्रस्टींनी मनाई केलेली आहे. व ती [विरूद्ध ] [स्थानिक ] ब्राह्मणेतर लोकांची जोराची चळवळ चालू आहे. अशा प्रसंगी ब्राह्मण्याच्या टांचेखाली तुडविलेल्या ब्राह्मणेतर लोकांनीं त्याच जिल्ह्यांत ब्राह्मण्याविरूद्ध झगडा करणाऱ्या अस्पृश्य लोकांस विरोध करण्यास [सिद्ध ] [व्हावें ] [ही ] मोठ्याच शरमेची गोष्ट आहे ! पण ते बिचारे काय करणार? त्यांचे पुढारी महात्मा ज्योतिबा फुल्यांचा † शतसांवत्सरिक उत्सव साजरा करण्यात [गुंग ] [झाले ] [असल्या ] [कारणानें ] त्यांना सन्मार्ग दाखविण्यास जागेवर कोणीच [नाहीं. ] महाडचा सत्याग्रह चालू असतांना ब्राह्मणेतर पुढारी महाडला ब्राह्मण्यविध्वंसन [होत ] [आहे ] [असे ] [ऐकून ] ““ महात्मा फुले की जय [“ ] म्हणून घरीं बसून [गजर ] [करणार ] [आणि ] [त्यांचे ] [अनुयायी ] महाडला येऊन हरहर महादेव म्हणून [ब्राह्मण्यांचें ] [संरक्षण ] [करणार ] [! ] [! ] [महाडला ] येणाऱ्यांना ब्राह्मणेतर पक्षांतील लोकांची [ही ] [एक ] [मोठी ] [गंमत ] [पाहावयास ] [सांपडणार ] आहे असें मोठ्या कष्टाने म्हणावें [लागतें. ] ईश्वर करो, आणि यापक्षाची अशी नाचक्की न होवो
† पाहा, परिशिष्ट क्रमांक-३६.
आजकालचे प्रश्न : बहिष्कृत भारत, ता. २३ डिसेंबर १९२७.