आम्हीहि सत्यशोधकींच आहोंत. सत्यशोधकी चळवळ म्हणजे, समानतेची व सदधर्माची चळवळ - Page 363

आम्हीहि सत्यशोधकींच . . . सद्धर्माची चळवळ ३१९

बिच्यान्या मनुचा त्यात काय दोष आहे ? मनुस्मृति ही एक कायद्याची, त्या वेळच्या प्रचलित असलेल्या रूढींची जंत्री आहे. तेव्हां ही जंत्री जाळल्याने

आजवर हिंदु समाजात रूढ झालेल्या जातिविषयक व स्पृश्यास्पृश्यविषयक

कल्पना थोड्याच नष्ट होणार ? अंत्यजत्वाची कल्पनाच आपल्या समाजांत रूढ झालेली आहे व ही कल्पना आपल्या सर्व धर्मग्रंथांतून सुद्धा आढळेल. आपल्यांतील नव्या व जुन्या सुधारकांनीं व संतांनीं ही कल्पना घालविण्याची खटपट केली पण त्यांना यश आलें नाहीं. त्यांना यश आलें नाहीं म्हणून आपण मात्र डगमगून जातां कामा नये. आपला प्रयत्न आपण जोरात चालविला पाहिजे. खबरदारी इतकीच घेतली पाहिजे कीं, आपल्या चळवळीला सत्यशोधकी वळण लागूंनये. ' सत्यशोधकी ' हा शब्द मी मुद्दाम वापरला आहे. सत्यशोधकी चळवळ म्हणजे ब्राह्मणांचा द्वेष करणारी, राजकारणांत भाग न घेणारी, सरकारच्या नजरेकडे लक्ष ठेऊन काम करणारी अशी आजपर्यंतची महाराष्ट्रांतील रूढ कल्पना आहे. या कल्पनेंत समाविष्ट असलेलें वळण आपल्या चळवळीलाहि न लागेल अशी खबरदारी आपण घेतली पाहिजे. आपला उत्साह अवर्णनीय आहे. आपल्या वर्तनानें अस्पृश्य वर्गांत आपण लोकप्रियताहि संपादन केली आहे, हें अभिनंदनीय आहे. अस्पृश्य गणल्या गेलेल्या समाजात आपल्यासारखे विद्वान्‌ व लोकहिताचा विचार करणारे गृहस्थ निर्माण झाले हें महाराष्ट्राचे सुदैव आहे. या सर्व उत्साहाला म. गांधींची अहिंसा वृत्ति व सरकारशी असहयोगवृत्ति यांची जोड मिळाल्यास आपली चळवळ यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीं. अस्पृश्य समाजाची चळवळ जर न्यायावर उभारलेली आहे तर सरकारच्या इंजंक्शनला तिनें कां भ्यावें ? खालच्या कोर्टात इंजंक्शन मिळालें त्याप्रमाणें वरच्या कोटनिंहि इंजंक्शन दिलें तर आपला सत्याग्रह कायमचाच थांबला म्हणावयाचा ! महाडचा सत्याग्रह म्हणजे कलेक्टरचा खेळ असेच दिसतें. सत्याग्रहाच्या पूर्वी तो स्पृश्य समाजाला धमकी देतो. व सत्याग्रहाच्या वेळीं इंजंक्शनचें निमित्त पुढें करून सत्याग्रह थांबवितो. अस्पृश्यांची सत्याग्रहाची ही

चळवळ याप्रमाणें सरकारी अधिकाऱ्यांच्या कक्षेत जावी हें राष्ट्रहिताचे नाहीं.

सरकारी कारस्थानांना वांव देण्यास या चळवळीचा उपयोग होतां कामा नये. महाडला मी येणार होतों. सत्याग्रह थांबला असें ऐकिलें म्हणून आलों नाहीं. पण तेथें आलों असतों तर बरें झालें असतें असें आतां वादूं लागलें. मनुस्मृतीचेंदहन मी आपल्या हातून होऊ दिलें नसतें. अस्पृश्य चळवळीविरूद्ध मनें कलुषित करण्याला ही गोष्ट आपल्या विरोधी पक्षाला कोलितीप्रमाणे उपयोगी

पडेल. |

आपण पुण्यास येणार असाल किंवा याल तेव्हाँ स्वराज्य ऑफिसाला पुन्हा भेट

द्यावी.