३२० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
सत्याग्रहासंबंधानें, मनुस्मृतीच्या दहनासंबंधानें स्वराज्यांत कांहीं लिहिणार होतों, पण तसें कांहीं लिहिण्यापूर्वी आपल्याला एकदां पत्र पाठवून व आपलें काय म्हणणें आहे तें अजमावून मग कसें लिहावयाचें तें ठरवून लिहावें म्हणून आपल्याला हें पत्र पाठविलें आहे. पत्राचें उत्तर शक्य तितके लवकर पाठवाल अशी आशा आहे. “
२. आम्ही जें टीकात्मक पत्र वर प्रसिद्ध केलें आहे त्यापेक्षांहि मोठी जहाल टीका धुळ्याच्या प्रबोधकारानें, पेणच्या कुलाबा समाचाराने, मुंबईच्या रणगर्जनेनें, पुण्याच्या भाला संग्राम कंपूनें व बेळगावच्या Waar heard महशूर आहेच. त्यांना उत्तर न देतां येवढ्या एका पत्रालांच आम्ही उत्तर देतों याचा कांहीं जणांना विस्मय वाटेल. परंतु या उपरिनिर्दिष्ट टीकाकारांना उत्तर न देण्याची कारणें अनेक आहेत. पहिलें असें कीं, त्यांच्या टीकेंत शिवीशिवाय दुसरें कांहींच नाहीं. त्यांच्या शिव्यांला कोणी भीक घालीत नाहीं. शिवाजीच्या वेळच्या मुसलमान इतिहासकारांनी शिवाजीस कुत्ता, मूषक, सैतान, गनिम, बंडखोर वगैरे शेलक्या शब्दांनी त्याची संभावना केली. येशुखिस्ताला त्याच्याच गणगोत्रांनीं राजद्रोहाचा आरोप करून रोमन सरदाराकडून Yo! देऊन आपले डोळे निवविले. महंमद पैगंबराचीहि त्याच्या लोकांनीं तशीच दशा उडविली. त्याला त्याचें जन्मस्थान जें मदिना शहर त्या शहरांतून हाकून लावण्यात आलें. व मक्केसारख्या परस्थ गांवीं त्याला आपल्या आयुष्याचे दिवस काढावे लागले. आमचीही तशी वासलात लावण्याचा योग येणार हें आम्ही जाणून आहों. व रायगडावरील घडलेंलें प्रकरण ही या भावी अरिष्टाची चुणुक आहे. कोणाहि क्रांतिकारक पुरुषाच्या आयुष्यांत हा संकटयोग असतोच. व तो असणें अगदीं साहजिक आहे. म्हणून जे लोक आम्हाला घि:कारतात, शब्दशाप देतात किंवा धमक्या घालतात त्यांच्या बोलण्याचा किंवा लिखाणाचा आम्हांस कवडीचाही विशाद वाटत नाही. या बाबतीत असल्या बीभत्स टीकाकारांना आमची अशी सूचना आहे कीं, अस्पृश्यांचे पुढारी स्वतःला कांहीं सर्वज्ञ समजत नाहींत. तथापि अस्पृश्य समाज उन्नतीच्या बाबतींत त्यांचीं तत्त्वें ठरून गेलीं आहेत. तपशीलाच्या बाबतींत आपल्या हातून चुका होतील हें त्यांना मान्य आहे. परंतु ह्या चुका दाखवून देतांना त्यांनीं आपली जीभ सैल सोडणें . हें त्यांच्या नाशाचें कारण आहे. याची त्यांनीं आठवण ठेवावी. एकदां वादांनीं पेट घेतला म्हणजे मग कोणाचे तोंड चालतें तर कोणाचा हात चालतो. महाडच्या सत्याग्रह परिषदेसंबंधी लिहितांना मुसलमान समाजाला जनावरांच्या रांगेत घातल्यामुळे, मुसलमान समाजाकडून एक साधें निषेध प्रदर्शक रजिस्टर पत्र आल्याबरोबर डॉ. आंबेडकरांना ' तुम्ही गडावर गेलांत, तें सांगून जावयाचे होते