आम्हीहि सत्यशोधकींच आहोंत. सत्यशोधकी चळवळ म्हणजे, समानतेची व सदधर्माची चळवळ - Page 366

आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन ३२२

अशी आजपर्यंतची या कारणांत मवाळ असावयाचे जहाल असलेले लोक समाज

त्या परंपरेस पुण्याचे स्वराज्यकर्ते हे एक देशांतली परंपरा होऊन राहिली आहे.

जसे जहाल अपवाद आहेत ही गोष्ट नाकबूल करणें शक्‍य नाहीं. राजकारणांत

आहेत याबद्दल आमची खात्री आहे. अशा तसेच समाज कारणांतही ते जहाल

परिस्थितींत मनुस्मृतीत ग्रथित केलेलीं तत्त्वें त्यांना मान्य असतील असें आमच्यानें म्हणवत नाहीं. तेव्हां त्यांनीं जो आक्षेप काढला आहे तो केवळ त्यांनीं मनुस्मृति वाचली नाहीं म्हणूनच काढला असावा असें म्हणणें प्राप्त आहे. तेव्हां आमच्या या मित्रांना आम्ही अशी प्रेमाची सूचना करतों कीं, त्यांनीं मनुस्मृति एकदां वाचावी. आम्ही जें मनुस्मृतीचें वाचन केलें आहे त्यावरून आमची खात्री झाली आहे कीं, त्या ग्रंथांत शूद्र जातीची निंदा करणारी, त्यांचा उपमर्द करणारीं, कुटाळ उत्पत्तीचा कलंक त्यांच्या माथी मारणारीं व त्यांच्याविषयीं समाजांत अनादर

वाढविणारीं वचनें ओतप्रोत भरलेली आहेत. त्यांत धर्माची धारणा नसून, धर्माची विटंबना आहे, आणि समतेचा मागमूस नसून, असमतेची मात्र धुळवड घातली

आहे. स्वयंनिर्णयाचें तत्त्व प्रस्थापित करावयास निघालेल्या सुधारणावाद्यांस असला ग्रंथ कधींच मान्य होणें शक्‍य नाही. व तो अस्पृश्य वर्गासही मान्य नाहीं एवढेंच दर्शविण्याकरितां महाड येथे त्याची होळी करण्यांत आली.

४. आमच्या मित्रांचा दुसरा असा एक आक्षेप आहे कीं मनुस्मृति ही जुन्या काळीं अंमलांत असलेल्या नियमांची एक जंत्री आहे. त्या जंत्रींतील नियम आज

कोणास लागू नाहींत. मग असलें जुनें बाड जाळण्यांत काय अर्थ आहे ? मनुस्मृति

हें एक जुनें बाड आहे असें आमच्या मित्राप्रमाणें आम्हासही महणतां आलें असतें

तर आम्हांस मोठाच आनंद झाला असता. परंतु दुर्दैवाने आम्हांस तसें म्हणतां

येत नाहीं. आणि आमची खात्री आहे कीं, भावी स्वराज्याचा चंद्रोदय केव्हां होतो

हें पाहण्याकरिता, आमच्या मित्रांचे डोळे आकाशाकडे लागले नसते तर आपल्या

पायांखालीं काय wed आहे हैं त्यांना निरखून पाहता आलें असतें. मनुस्मृति

हें एक जुनें बाड आहे, तें राहिलें तरी कांही हरकत नाही असा युक्तिवाद करणाऱ्या गृहस्थांना नुकतीच प्रसिद्ध झालेली बळहायी लोकांवरील जुलमाच्या कहाणीकडे

त्यांनीं लक्ष द्यावें अशी आमची आग्रहाची सूचना आहे. मध्य हिंदुस्थानांत कांहीं

दिवसांपासून बळहायी नांवाच्या अस्पृश्य जातींत सुधारणेचे वारें शिरले आहे. व

त्याप्रमाणें या बळहायी जातींतील स्त्रीपुरुषांनीं आपले जुने व हीनपणादर्शक रिवाज

व चालीरीति, तसेंच पेहराव सोडून देऊन वरिष्ठ वर्गाच्या हिंदूंची जशी वागणूक आहे तशी वागणूक आपणही ठेवण्याबद्दलचे ठराव केले. व ते अंमलांतही

आणले. परंतु सुधारणा करण्यास निघालेल्या या बिचाऱ्या बळहायी लोकांचे

ठराव अमलांत येतात तोंच दरेक गांवच्या स्पृश्य हिंदूंनी आपापल्या गांवच्या

डब्ल्यू-२०७३-२१ ब॒ `