आम्हीहि सत्यशोधकींच आहोंत. सत्यशोधकी चळवळ म्हणजे, समानतेची व सदधर्माची चळवळ - Page 367

आम्हीहि सत्यशोधकींच . . . सदृधर्माची चळवळ ३२३

बळहायी लोकांस अशी नोटीस दिली कीं, तुम्हांस जर आमच्या गांवांत नांदावयाचे असेल तर तुम्ही खालील अटी पाळल्या पाहिजेत. (9) बळहायी पुरुषानें भरजरी पागोटें डोक्यास बांधूं नये. (२) बळहायी पुरुषांनी रंगीत किनारीची अगर रुईफुल किनारीची धोतरें नेसता कामा नये. (३) बळहायी लोकांनी गांवांत कोणाहि स्पृश्य माणसाच्या घरीं मयत झाल्यास त्या मयताची खबर त्याच्या नातेवाईकांस मग तो नातेवाईक कितीही दूर राहात असो त्याला पोहोचविलिच पाहिजे. (४) स्पृश्य हिंदूंच्या लग्नामध्ये व वरातींमध्ये बळहायी लोकांनी वाजंत्री वाजविण्याचे काम केलेंच पाहिजे. (५) बळहायी स्त्रियांनी चांदीचे अगर सोन्याचे दागिने घालतां कामा नये, तसेंच त्यांनीं ऊंच प्रतीचीं अगर उंच मोलाची झबलीं अगर चोळ्या घालूं नयेत. (६) बळहायी स्त्रियांनी सुविणीचे काम केलेच पाहिजे. (७) स्पृश्य लोक देतील तें मोल घेऊन, सांगतील तें काम करण्यास बळहायी लोकांनी तयार असलें पाहिजे. कांहीं ठिकाणी वरील नियम एका करारपत्रकांत घालून, सह्या करा नाहीं तर गांवांतून जा, असा बळहायी लोकांस पेंच टाकला आहे. व त्याप्रमाणें कांहीं स्वाभिमानी बळहायीं लोकांनी आपल्या माणुसकीवर तिलांजली देण्याऐवजी हजारों वर्षे जेथे ते व त्यांचे पूर्वज राहिले ते गांव सोडून त्यांनी देवास वगैरे जवळपासच्या संस्थांनांत व ब्रिटीश हद्दीत जाऊन राहिले आहेत. जसा मध्य हिंदुस्थांनांत बळहायी लोकांवर प्रसंग गुदरला आहे तसाच प्रसंग या इलाख्यांतील कुलाबा व रत्नागिरी जिल्ह्यांतील महार लोकांवर गुदरला आहे. मागे एकदां भालाकारांनें मोठ्या dear सांगितलें कीं, बौद्ध लोकांनी यज्ञांत होणाऱ्या हिंसेचा आधार घेऊन, ब्राह्मणांवर हत्यार चालविले, पण ब्राह्मणांनी एका झटक्यास मद्य व मांस पूर्णपणे सोडून देऊन, बौद्ध लोकांवर मात केली. अशा लिखाणानें हा घमेंडानंदन असें भासवूं इच्छितो कीं, याच्या बाप जाद्याच्या अंगांत जो करारीपणा आहे तो करारीपणा अस्पृश्यांच्या अंगांत नाहीं. असली फुशारकी मारणाऱ्यांस आम्ही असें सुचवितो कीं, त्यांनी कुलाबा व रत्नागिरी जिल्ह्यांत दौरा काढून अस्पृश्य लोकांच्या आंगींही किती करारीपणा बाणला आहे याची त्यांनी खात्री करून घ्यावी. दौऱयाअंती कळून येईल कीं, मार्च १९२७ पावेतों जे लोक मेलेली जनावरें ओढून नेण्याचा आग्रह धरीत होते

व त्यांचे मांस खाणे आपला धर्म आहे म्हणून मानीत होते त्याच लोकांनी आतां

मांसाला न शिवण्याचा निश्चय केला आहे. इतकेच नव्हे तर मेलेल्या जनावराला ते शिवत देखील नाहींत. तसेंच आज इतके दिवस वतनाच्या हक्कापैकीं, एक हक्क म्हणून, गांवातून भाकर मागण्याचा जो पुरातन प्रघात होता तो अजिबात बंद करण्यांत आला आहे. ब्राह्मणांनीं मद्य मांस सोडलें त्यांत त्यांना स्वार्थ साधावयाचा होता म्हणून सोडले, कारण बुद्ध भिक्षूंची जागा प्राप्त करून