आम्हीहि सत्यशोधकींच आहोंत. सत्यशोधकी चळवळ म्हणजे, समानतेची व सदधर्माची चळवळ - Page 369

आम्हीहि सत्यशोधकीच . . . सद्धर्माची चळवळ ३२५

साधणार आहे. समाजात रूढ झालेल्या जातिविषयक व स्पृश्यारपृश्य विषयक कल्पना तेणें करून कांहीं नष्ट होणार नाहींत. उलट कांहीं स्पृश्य लोकांची सहानुभूति मात्र गमावण्याचा संभव आहे. यावर आमचें उत्तर असें कीं, असहकारितेच्या चळवळींत म. गांधींनीं स्वदेशी कपडा जाळून काय साधले ? खानमालिनी विवाहाच्या प्रकरणांत ज्ञानप्रकाशाची होळी करणाऱ्या लोकांनीं काय साधले ? राजकीय सुधारणांची चौकशी करण्याकरितां येणाऱ्या सायमन कमिशनवर बहिष्कार घालून काय साधणार आहे? मिस मेयोनें लिहिलेल्या मदर इंडिया! पुस्तकाचा नुकताच न्यूयार्क शहरीं ज्यांनी होम केला त्यांना काय मिळवावयाचे होते ? परदेशी कपडा जाळून, ज्ञानप्रकाशाची किंवा मिस मयोच्या पुस्तकाची होळी करून किंवा सायमन कमिशनवर बहिष्कार घालून जी गोष्ट साधावयाची होती तीच गोष्ट आम्हांस मनुस्मृति जाळून साधावयाची आहे. होळी करणें हा एक निषेध दर्शविणाऱ्या अनेक प्रकारांपैकीं एक प्रकार आहे व तो प्रकार कांहीं रानटीपणाचा आहे असेंही म्हणतां यावयाचें नाहीं. तो शिष्टसंमत झाला आहे याबद्दल कोणासही ना म्हणतां येणार नाहीं. निषेध दर्शविण्याचा मुख्य हेतु म्हणजे ज्यांच्याविरूद्ध आपण निषेध प्रदर्शित करितों त्याला लाज वाटावयास लाऊन व त्यांच्यात विचार जागृती करून त्यांच्या वर्तणुकीत योग्य तो फेरबदल करून आणावयाचा असा असतो. मनुस्मृति जाळून जो निषेध आम्ही व्यक्त केला त्यांत ब्राह्मण्याचा म्हणजे हिंदुसमाजांतील उच्च नीच भावनेचा इनकार व्यक्त करण्याचा आमचा हेतु होता. आमचा इनकार ध्यानांत घेऊन ब्राह्मण्यग्रस्त लोक आपल्या वर्तणुकीत फेरबदल करतील अशी आमची आशा आहे. व त्या आशेनेच हैं सर्व कार्य केलेलें आहे. आतां आमचे मित्र जी शंका घेतात कीं मनुस्मृति जाळल्याने ब्राह्मण्य नष्ट होणार नाहीं, ती शंका जर दुर्दैवाने खरी ठरली तर ब्राह्मण्य विध्वंसनासाठी ब्राह्मण्यग्रस्त लोकांना जाळणे किंवा हिंदुधर्माचा त्याग करणें या दोहोंपैकी कोणती तरी एक गोष्ट करावी लागेल. स्पृश्यलोकांची सहानुभूति गमावण्याचा आक्षेप तर अगदीं खुळा आहे असें आम्ही समजतों. मनुस्मृति मस्तकावर धारण करून अस्पृश्य लोकांना आम्ही तुमचा उद्धार करतो असें म्हणणें म्हणजे भस्मासुराने एका हातांत शंकराने दिलेला खडा घेऊन दुसरा हात मस्तकावर ठेवून तुझें कल्याण करतों असें म्हणण्यासारखे आहे असें आम्हांस वाटतें. मनुस्मृतीचा एका बाजूनें अभिमान धरणें व दुसऱ्या बाजूनें SLATER करू म्हणणें या दोन गोष्टी इतक्या परस्पर

t पाहा, परिशिष्ट क्रमांक-३७.