आम्हीहि सत्यशोधकीच . . . सद्धर्माची चळवळ ३२९
९. महाडची बारडोली" केली असें जे मूर्ख बडबडतात त्यांनी ती कां झाली हें समजून घेण्याचे श्रम घेतले असते तर त्यानीं छिद्रान्वेश करण्याऐवजी शरमेनें आपल्या माना खाली घातल्या असत्या. स्पृश्यांच्या सत्याग्रहांत व अस्पृश्यांच्या सत्याग्रहांत जमीन असमानचे अंतर आहे. स्पृश्य लोकांचा सत्याग्रह सरकार विरूद्ध असतो व त्याला सर्व जनतेचा पाठिंबा असतो. असें असताना स्वराज्याचा अट्टाहास करणाऱ्या स्पृश्य लोकांनीं कोणता एखादा सत्याग्रह करण्याची तयारी केल्याचे ऐकीवांत नाहीं. अस्पृश्य लोकांनी सत्याग्रह केला तर त्याला साऱ्या स्पृश्य जनतेचा विरोध असतो. समाजाशी सामना करणे साधे काम नाहीं. असें असतांहि स्पृश्य जनतेच्या विरूद्ध सत्याग्रह करण्याची अस्पृश्य वर्गाने आपली तयारी दाखविली होती. एवढ्या मुळेंच अस्पृश्य लोक कोणाहि समंजस माणसाच्या आदरास पात्र झालें पाहिजेत. तयारी करून चाल करण्याचें त्यांनी थांबविलें तर तें स्पृश्य वर्गाने युद्धाच्या अधर्म पद्धतीचा अवलंब केल्यामुळेच होय. स्पृश्य लोकांनी तुम्ही धर्म युद्ध करावे आणि मग त्यांनीं आमची परीक्षा पाहावी. यावर कांहीं छिद्रान्वेशी लोक असें म्हणण्याचा संभव आहे की, स्पृश्य जनतेकडून जुलूम होणार याची कल्पना सत्याग्रहास जमलेल्या लोकांना पूर्णपणे होती. तो जोर जुलूम सोसण्यास ते जर आपण होऊन तयार झाले होते तर त्यांची काळजी घेण्याचें सोंग तुम्ही कां केलें ? असल्या आक्षेपकांस आमचा असा प्रश्न आहे कीं अनुयायांच्या हिताची काळजी पुढाऱ्यांनी घेऊ नये तर कोणी घ्यावी ? स्वामीनिष्ठेनें पुष्कळसे लोक आगींत उडी टाकण्यास आपल्या जिवावर उदार होतात. परंतु सेवक आपल्या जिवावर उदार झाला तो स्वखुषीने झाला आहे तेव्हां आपल्याला काय ? त्याचें तो भोगील, असें मानून आपली जबाबदारी जर त्याचा स्वामी टाळ्ं म्हणेल तर त्याला लोक अधम म्हणतील. आपल्या जिवावर उदार होणारा सेवक आपला स्वामी अखेरीस आपला बचाव करील अशी आशा धरून असतो हें कोणीहि नाकबूल करणार नाहीं. नाहीं म्हणतां तशी आशा सत्याग्रहास जमलेल्या मंडळीस होती व ती असणे साहजिक आहे. तेव्हां त्यांच्यावरील संकटाचें निवारण करण्याची जबाबदारी जी पुढाऱ्यावर पडावयाची ती कांहीं चुकत नाहीं हें आम्हांस ओळखणें प्राप्त होतें. अशा परिस्थितींत सत्याग्रह करणाऱ्या लोकांना त्यांच्यावर येणाऱ्या संकटात आम्हांला कसें सहाय्य
१ . इंग्रज सरकारने शेतसाऱ्यात अवास्तव वाढ केल्याने बारडोली तालुक्यातील शेतकऱ्यांनी साराबंदीच्या विरोधात सत्याग्रहाची चळवळ उभारली [होती. ] त्याचे नेतृत्त्व वल्लभभाई पटेल यांचेकडे होते. परंतु हिंसक वळण लागू नये म्हणून. गांधींनी ही चळवळ [बेमुदत ] [बंद ] [केली ] होती. बारडोलीच्या सत्याग्रहापासूनच वल्लभभाई पटेलांना [सरदार ] [म्हटले ] [जावू ] [लागले ] [होते. ]