या संस्थांचा उपयोग अस्पृश्यांच्या हितसंवर्धनाकडे होईल किवा नाही हे प्रतिनिधींच्या लायकीवर व कार्यक्षमतेवर अवलंबून. - Page 378

३३४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

खरें असेल तर तसें न होण्याची खबरदारी पुणेंकरांनी आतांपासूनच घ्यावी हें बरें लायकी नालायकी न पहातां केवळ मातंग समाजाची कोठें तरी वर्णी लावावयाची असेंच जर असेल तर रा. सकटापेक्षां रा. लोखंडे यांना तो मान मिळणे उचित आहे असें आम्हांस वाटतें.

आजकालचे प्रश्‍न : बहिष्कृत भारत, ता. ३ फेब्रुवारी १९२८.