७६
बहिष्कृत भारताचे ऋण हें लौकिक ऋण नव्हे काय ?
आज बहिष्कृत भारत पत्रास एक वर्ष पुरें झाल्याचें जाहीर करण्यास प्रस्तुतच्या
लेखकास आनंद होतो व पुढील अंकापासून पत्राच्या दुसऱ्या वर्षास प्रारंभ होऊन, पहिल्या वर्षाप्रमाणेंच दुसऱ्या वर्षीहि तें सतत प्रसिद्ध होत जाईल अशी त्यास आशा आहे. तुफान झालें असतां आपल्या गलबताची डोलकाठी, शीड, नाळ वगैरे सामान धड आहे किंवा नाहीं, तसेंच गलबतावर जरूर तेवढें खलाशी आहेत किंवा नाहींत याची चांगली चौकशी केल्याशिवाय कोणताही नावाडी भर दर्यात आपलें गलबत हाकारीत नाहीं. बहिष्कृत भारताच्या झंझावातानें महाराष्ट्रांतील हिंदूसमाजांत एकप्रकारचें तुफान झालें आहें हें कोणासच सांगण्याची जरूरी नाहीं. मग अशा तुफानांत आपल्याजवळ सर्व साहित्य आहे किंवा नाहीं याची पूर्ण चौकशी केल्याशिवाय सदरहु वर्तमान पत्राच्या कर्णधारकत्वाचें काम प्रस्तुतच्या लेखकानें तरी कसें हाती घ्यावें? यास्तव पहिल्या वर्षाच्या अखेरीस व दुसऱ्या वर्षाचा प्रारंभ होण्यापूर्वी
बहिष्कृत भारताच्या परिस्थितीचे सिंहावलोकन
करून तिचा नक्शा बहिष्कृत वर्गापुढें मांडून त्यासंबंधी बहिष्कृत वर्गाचें कर्तव्यकर्म कोणतें याची त्यास जाणीव करून देणें प्रस्तुतच्या लेखकांस ` अगत्याचे वाटतें.
बहिष्कृत भारताची सांप्रतची अवस्था अत्यंत शोचनीय आहें हे जाहीर करण्यास प्रस्तुतच्या लेखकास मोठे कष्ट वाटतात. खर्चाचा व मिळकतीचा आढावा काढला असतांना आजमितीस बहिष्कृत भारतावर कर्जाचा ५०० रुपयांचा बोजा चढला आहे. खरें म्हटले असतां, बहिष्कृत भारताची अशी शोचनीय स्थिती होऊं नये. कोणतेंही पत्र घेतलें तरी त्यांच्यासाठीं संपादकाच्या व्यवस्थापकाच्या व त्यांच्या हाताखालील कामधंदा करणाऱ्या शिपाई प्याद्यांच्या पगारांचे तगाद्यावर तगादे असतात. मोठमोठी समाजकार्ये घडवून आणण्याच्या पवित्र उद्देशाने प्रस्थापित करण्यात आलेल्या पत्रांचीही या तगाद्यापासून सुटका झालेली नाही. परंतु यास बहिष्कृत भारत एक अपवाद आहे असे म्हटले असतां त्यास प्रत्यवाय येईल असे मुळीच वाटत नाहीं. बहिष्कृत भारताच्या संपादकास अथवा त्यांच्या व्यवस्थापकास त्यांनी वर्षभर जी दगदग सोसली व जी मेहनत घेतली, त्याबद्दल