बहिष्कृत भारताचें ऋण हें लौकिक ऋण नव्हे काय ? - Page 380

३३६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

त्यांना एक पैचाहि मोबदला देण्यांत आला नाहीं. छपाई व टपाल याशिवाय बहिष्कृत भारताच्या संबंधांत खर्चाच्या काय त्या दोनच बाबी होत्या. एक कचेरीचें भाडें व दुसरें एका नोकराचें वेतन. पण या दोहींचा मिळून झालेला खर्च इतका क्षुल्लक आहे कीं, तो जमेस धरण्यासारखा नाहीं असें कोणीही म्हणेल. साऱ्या वर्षांत कचेरीचें as २०५ रु. ८ आणे झाले व शिपायाच्या पगाराच्या खाती फंक्त ९८ रुपयेच पडले आहेत. यावरून बहिष्कृत भारताइतके काटकसरीनें चालविलेलेँ दुसरें पत्र महाराष्ट्रांत नाहीं याबद्दल शंका घेणें अशक्य आहें. असें असतानांहि एका वर्षांचे आंत बहिष्कृत भारतावर पाचशें रुपयेपर्यंत कर्ज झाले आहे व आहे तीच परिस्थिति जर राहिली तर हा कर्जाचा डोंगर वर्षो- वर्षी वाढत जाणार आहें. व तसा जर तो वाढत गेला तर बहिष्कृत भारत बंद करावें लागेल किंवा त्याची बूड भरून निघेल अशी कांहीतरी कायमची व्यवस्था करावी लागेल.

प्रचलित हिंदु धर्माच्या अतिघोर अन्यायास्तव आपल्या समाजास अस्पृश्यमानण्याचे महापातक विश्वजनक प्रभूला न जुमानता करणारे कोट्यावधि अविवेकी जन जोपर्यंत या हिंदभूमीवर कायम राहाणार तोपर्यंत हा अस्पृश्य समाज निष्कृष्ट स्थितिमध्यें खितपत पडणार आहे, हें कोणांस सांगावयास नको. या स्वार्थिपणाच्या अन्यायामुळें बहिष्कृत मानलेला एवढा मोठा जनसमूह सामाजिक, राजकीय व आर्थिक दृष्ट्या कल्पनातीत प्रमाणांत कसा अधोगतीस गेला आहे हे सर्व लोक जाणून आहेतच. इंग्रज सरकारच्या अमदानींत कोणाच्याहि मानवी हक्कांची जाणूनबुजून पायमल्ली केली जात नाही; सर्वांना सारख्या प्रमाणांत विद्येची द्वारें खुली आहेत; त्याचप्रमाणें सर्वांना सार्वजनिक साधनांचा सारखा उपयोग करून घेण्यास मनाई नाहीं, असें जरी सर्वत्र सांगण्यांत येते तरी त्यास तेथील सामाजिक परिस्थितीस अनुसरून वागावें लागत असल्यामुळें बहिष्कृत वर्गातील लोकांस इंग्रजी राज्यांत देखील या देशांतील अमानुष आचाराविचारामुळें अगदीं हलक्या सलक्या मानवी हक्कांस पदोपदी मुकावें लागत आहें. अशा बिकट परिस्थितीत आमच्या बहिष्कृत समाजानें एखाद्या हवालदीलाप्रमाणें नशीब म्हणून स्वस्थ बसण्याचा आत्मघातकीपणा करण्याऐवजी आपले मानवी हक्क आपण ओळखून ते प्राप्त करून घेण्यास ब्रिटिश सरकारच्या साम्राज्य छत्राखाली एक दिलानें व जोमानें अविश्रांत श्रम करण्यास त्यानी निरंतर तयार असले पाहिजे हें निर्विवाद आहें. तशा प्रकारचा जोम व ऐक्य उत्पन्न होण्यास बहिष्कृत समाजांस जागरूक करण्याचें काम अव्याहत चालू ठेवलेंच पाहिजे. त्याशिवाय त्यांना त्यांच्या खालावलेल्या स्थितीची जाणीव पटणार नाहीं. तसेच शिक्षणाच्या