MR/Khand_19 - Page 38

कैफियत सादर करताना हे लेखन कधी भावकोमल व व्याकुळ होते तर कधी अस्पृश्यवर्गाला आजन्म गुलाम करणाऱ्या प्रस्थापितांवर हल्ला चढविताना हे लेखन तेजाबाप्रमाणे ज्वलजहाल रूप घेते. व्यापक व सर्वस्पर्शी समाजप्रबोधनाकरिता बाबासाहेब संपूर्ण सामर्थ्यानिशी विचारसंघर्षाच्या रणांगणात उतरतात व प्रतिपक्षाला नामोहरम करून समतावादी नवमूल्यांची निर्मिती करतात. या नवमूल्यांच्या निर्मितीची महन्मंगल प्रभा बहिष्कृत भारतातील लेखनावर सर्वत्र पसरली असल्यामुळे त्यांचे हे लेखन विलक्षण वाचनीय व मननीय रूप धारण करते.

बहिष्कृत भारतातील लेखांमधून बाबासाहेबांचे अंतर्मन समग्रपणे प्रतिबिबित झाले आहे. त्यांच्या जीवनातील भले-बुरे प्रसंग, विचारांचे उतार-चढाव, कडू-गोड आठवणी; हे सारे या लेखनातून हळूवारपणे प्रत्ययास येते. बाबासाहेबांचे संपूर्ण जीवन हे मुळात रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग या प्रकाराचे होते. त्यातल्या त्यात जनप्रबोधनार्थ वृत्तपत्र व्यवसाय सुरू केल्यामुळे आर्थिक टंचाई तर आणखीच भरीस भर म्हणून वाढली होती. बाबासाहेबांना वृत्तपत्र चालविताना किती त्याग करावा लागला, किती अडचर्णीना तोंड द्यावे लागले; यासंबंधात त्यांनी केलेले आत्मनिवेदन हे मूळातून पाहण्यासारखे आहे. बहिष्कृत भारताचे ऋण हे लौकिक ऋ7ण नव्हे काय? या लेखात बाबासाहेब आपले अंतःकरण मोकळे करताना लिहितात, ““ प्रस्तुतच्या लेखकाने समाजकार्याप्रित्यर्थ जेवढा स्वार्थत्याग करणे त्यास शक्य होते तेवढा स्वार्थत्याग त्याने केला आहे. तो काही संस्थानिक नाही किंवा जहागीरदारही नाही. रानात नाही शेत व गावात नाही घर असे त्याच्यासंबंधी एकाने केलेले विधान सत्य आहे. काही झाले तरी म्हणण्यासारखी द्रव्यानुकूलता नसता इंग्रज सरकारने देऊ केलेली दरमहा अडीच हजार रुपयांपर्यंत वाढू शकणारी नोकरी त्याने मला नको म्हणून सांगितली. वाकिलीसारख्या स्पृश्य लोकांवर अवलंबून असणाऱ्या धंद्यात विशेष किफायत मिळण्याची आशा नसतानाही केवळ समाजकार्य करण्यास मोकळीक असावी म्हणून त्याने तो पत्करिला आहे. रुढ धर्माचारातील आणि लोकाचारांतील दोषांचे निर्मयपणे आविष्करण करण्याचे भयंकर कार्य हाती घेतले असल्यामुळे, देशाभिमानी व धर्माभिमानी म्हणविणाऱ्या पत्रांकडून होत असलेल्या शिव्यांचा व शापांचा भडिमार तो एकसारखा सोशीत आहे. स्वमतांचे मंडन व तद्नुसार होईल तेवढे वर्तन करण्याचे त्याने ठरविल्यामुळे स्पृश्य वर्गातील आपल्या फार दिवसांच्या मित्रांचा दीर्घ रोष त्याने आपणावर करून घेतला आहे व जेणे करून त्याच्या धंद्यात त्यास मिळू शकणाऱ्या मदतीस तो दुरावला आहे. कवडीचा

(तीस)