बहिष्कृत भारताचें . . . ऋण नव्हे काय ? ३३७
बाबतीत त्यांना कोणकोणत्या अडचणी येतात, सरकारी नोकरीत त्यांचा शिरकाव होतो किंवा नाहीं, पडीक व फोरेस्ट जमिनी त्यांना मिळतात किंवा नाही, या गोष्टी सरकारच्या कानावर घातल्याखेरीज त्या बाबतीत योग्य ती दाद लागणार नाहीं. महारकीचा प्रश्न, सार्वजनिक तळी व देवालयें यातील अस्पृश्यतेचा प्रश्न यांना आतांसें कोठें तोंड लागलें आहे. या बाबतीत सरकार व स्पृश्य जनता यांच्या पुढें बहिष्कृत वर्गाचे काय मत आहे हैं वारंवार मांडून त्यावरील आक्षेपांचें खंडन करीत राहिलें तरच इष्ट तो परिणाम घडून येईल; परंतु तो परिणाम घडवून आणण्यासाठी बहिष्कृत भारतासारखे एकादे निर्भीड वर्तमानपत्र असल्याशिवाय भागणार नाहीं. वरील विवेचनावरून बहिष्कृत समाजास बहिष्कृत भारताची किती आवश्यकता आहे हें उघड होईलच. ते बंद झालें तरी हरकत नाहीं असा कोणी शहाणा माणूस म्हणेल अशी कल्पनासुद्धां करवत नाही. बहिष्कृत भारत हें चालवलेंच पाहिजे असे जर आहे, तर त्याची बूड भरुन निघेल अशी कांहीं तरी
कायमची व्यवस्था करर्णे प्राप्त आहे.
बहिष्कृत भारताची बूड दोन प्रकारें भरुन काढता येण्यासारखी आहें. त्यांपैकी वर्गणीदारांची वाढ करणें हा एक प्रकार आहें.
बहिष्कृत भारतास वर्गणीदारांची उणीव पडण्याचें कारण काय असावें याचा प्रस्तुतच्या लेखकास समज पडत नाहीं. एक गोष्ट खरी आहे कीं, बहिष्कृत भारत वेळेवर निघत नाहीं. व निघालें तर वेळेवर वर्गणीदारांच्या हाती पडत नाहीं. हा आरोप जरी प्रस्तुतच्या लेखकांस कबूल करणें प्राप्त आहे, तथापि तो बुद्धिपुरःसर किंवा आळसामुळें घडलेला आहे असा कोणीही आपला समज करून घेऊ नये. इतर वर्तमान पत्रांच्या संपादकास दुय्यम संपादकाची व बाहेरच्या लेखकांची जोड असते व त्यामुळें यांच्या बाबतींत श्रमविभाग होऊन, लेखनाचें काम वेळच्या वेळेवर होऊ शकतें. तसेंच व्यवस्थापकाचें काम पाहणारा माणूस पगारी नोकर असल्याकारणानें त्यास त्याचें नियमित काम पाहण्याशिवाय
दुसरें कांहीच करावयाचें नसल्यामुळे, त्याच्या हातून पत्राची व्यवस्था ठेवण्याचे काम बिनचूक व्हावें हें अगदी साहजिक आहे. बहिष्कृत भारताची स्थिति अशा प्रकारची असती तर त्याच्याहि बाबतीत नियमितपणा, व्यवस्थितपणा यांच्या दृष्टीने जे दोष घडले आहेत ते दोष घडले नसतें. प्रस्तुतच्या लेखकास सांगणे प्राप्त आहे कीं बहिष्कृत भारताच्या संपादकास मदत करण्यास दुय्यम संपादक ठेवण्याइतकी पत्राची सांपत्तिक स्थिति नव्हती. तसेंच बिनमोली संपादकी काम
डब्ल्यू-२०७३-२२ अ