डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ३३८
बहिष्कृत माणूसही लाभला नाही. असा अस्पृश्यांतील करण्यास स्वार्थत्यागी
गेल्यामुळे म्हणा, किंवा सार्वजनिक प्रौढ लिखाणास दबून भारताच्या संपादकाच्या
मिळावा नसल्यामुळें म्हणा बाहेरच्या लेखकांचा त्यास कार्याविषयी चढचढ वाटली
अशा परिस्थितीत बहिष्कृत भारताचे २४/२४ तितका पाठिंबा मिळाला नाहीं.
रकानें लिहून काढण्याची सारी जबाबदारी एकट्या संपादकास घ्यावी लागली. बहिष्कृत भारताच्या संपादकाच्या पाठीं पोटाचा धंदा आहेच. इतकेंच नव्हे तर बहिष्कृत हितकारिणी सभेसारख्या सार्वजनिक संस्थेचे वाढतें कामही त्यासच पहावें लागत आहे. हे सर्व सांभाळून त्याला संपादकाचें काम करावयाचें असतें. तें काम त्याच्या हातून ठराविक वेळीं जर झालें नाहीं, तर त्या दोषाबद्दल वाचकांनी त्यास क्षमा करणें प्राप्त आहें. बहिष्कृत भारताचा व्यवस्थापकही कांहीं पगारी नोकर नव्हे. तोही पोटाचा धंदा संभाळून फावल्या वेळांत पत्राची व्यवस्था पाहत असतो. त्याला जर पत्राच्या अनेक भानगडींची विल्हेवाट वेळच्या वेळीं करतां आली नाहीं तर तो दोष त्याचा आहे किंवा परिस्थितीचा आहे याचाही विचार वाचकांनी करणें जरूर आहे. एवढ्याने ज्या आक्षेपकांचें समाधान होत नाही त्यांना असें विचारणें प्राप्त आहे कीं, अनियमितपणामुळें जें नुकसान झालें असेल तें मरुन निघण्यासारखें बहिष्कृत भारतांत कांहीच नव्हतें काय? बहिष्कृत भारत वेळेवर निघालें नसेल. पण आठ पानांचे पत्र काढून, चार पानें जाहिरातीला
खर्ची घातल्याची पद्धत बहिष्कृत भारतानें स्विकारली होती काय? किंवा बहिष्कृत
भारताचे रकाने सोड्चिट्ठयांच्या नोटिसानीं, किंवा गटारगप्पानों भरून काढलेले आहेत
काय ? प्रस्तुतच्या लेखकांस सांगण्यास अभिमान वाटतो कीं, बहिष्कृत भारताने
आपली आठचीं आठ पानें वर्गणीदारांस समर्पण केली आहेत. बऱ्यावाईट
जाहिरातींचा त्याला विटाळसुद्धां होऊं दिला नाहीं. त्यातील मजकूर मोठमोठीं
हेडिंगें देऊन, ओळी ओळीत जागा सोडून, होता होईल तितका कमी करण्याचा
अंगचोरपणा 'केलेला नाहीं. लिखाणांच्या दर्जाच्या दृष्टीनें जर पाहिलें तर
बहिष्कृत भारत टाकाऊ पत्र आहे असे HSS म्हणतां यावयाचें नाही. महाराष्ट्रांत
जीं कांहीं वाखाणलेली पत्रें आहेत त्या पत्रांपैकीं बहिष्कृत भारत हें एक आहे. हें
प्रस्तूतच्या लेखकांस स्वतः सांगण्याचे कांहीं कारण नाही. यापत्राचा दर्जा किती
मोठा आहे यांतील लेख किती भारदस्त व उद्बोधक असतात याची ग्वाही इतर
वत्तपत्रकारांनी यापूर्वीच दिलेली आहे. असे असतांना पत्राच्या अनियमितपणाचें
वैगुण्य हैं वर्गणीदारांच्या पडलेल्या तुटवड्याचें कारण आहे. यावर प्रस्तूतच्या
लेखकाचा भरंवसा बसू शंकत नाहीं. बहिष्कृत भारताच्या शोचनीय स्थितीचें
बहिष्कृत वर्गात अजूनही असलेली
डब्छ्पू-२०७३-२२ ब