बहिष्कृत भारताचें . . . ऋण नव्हे काय? ३३९
समाजकार्याबददलची अनास्था
हेच मुख्य कारण आहे. ती अनास्था जर नसती तर बहिष्कृत भारतास तोटा येण्याऐवजी तें किमयेचें साधन झालें असतें. अस्पृश्य समाज केवढा तरी अफाट आहे. एवढ्या एका पत्राशिवाय त्यांच्या हितानुहिताची चर्चा करणारे व त्यांच्याचपैकी एकानें चालविलेलें दरेक गांवच्या अस्पृश्य लोकांनीं समाईकपणें
TATA एकेक अंक घेण्यास कांही हरकत नव्हती. पण प्रस्तुतच्या लेखकाची
आशा मुळापासूनच अगदी लहान होतीं. अस्पृश्य समाज हा अज्ञ लोकांचा समाज आहें. त्यांच्यातून पुष्कळसा मोठा वाचकवर्ग सापडणें कठीण आहें. याची जाणीव प्रस्तूतच्या लेखकास होतीच. तथापि त्यांस एवढा भरवंसा होता कीं, निदान अस्पृश्य वर्गातील सुशिक्षित असा जो शिक्षक वर्ग तो तरी या पत्राला आपला पूर्ण आश्रय देईल व तसा आश्रय देण्याचा त्यानें जर निश्चय केला असता, तर बहिष्कृत भारत किमयेचें साधन झालें नसतें तरी त्याला तूट आली नसती हें
Akasa. परंतू बहिष्कृत वर्गाच्या दु्दैवानें त्यांच्यातूनच उत्पन्न झालेला हा
शिक्षक वर्ग आपल्या कर्तव्याला जागला नाहीं. अस्पृश्य शिक्षकांतील शेकडा ७५ लोक अजूनही बहिष्कृत भारताचे वर्गणीदार नाहींत. व जे आहेत त्यांची वागणूक स्वतःसाठी कमाई करण्याच्या हेतूनें काढलेल्या wait जशी असावी तशी असते. एका शिक्षकाने पत्र घेतलें. काही अंक गेल्यानंतर दस्तुरप्रमाणे त्याला ३ रु. ४ आण्यांची व्ही. पी. करण्यात आली. तिचा त्यानें त्या वेळीं स्वीकार केला नाहीं. पुढें त्यानेंच २ रु. १४ आण्यांची मनिऑर्डर केली, व लिहिलें कीं, ३ रुपये वर्गणीपैकी २ आणे मनिऑर्डरीचा खर्च कापून घेतला आहे. तरी पत्र चालू करावें. खरे म्हटले असतां या गृहस्थाने झालेला खर्च भरून काढण्यासाठी, ३ रु. ४ आ. ची मनिऑर्डर पाठवावयास पाहिजे होतीं. परंतु तसें न करता ६ आण्याची खोट दिल्याबद्दल तक्रार करण्यात आली. तेव्हां त्यानें खालील आशयाचे पत्र लिहून पाठविलें.
“ कृतानेक साष्टांग नमस्कार वि. वि. ( परमेश्वराने मला स्वार्थ बुद्धि दिलीच नाहीं ) मी आपणास जोडकार्ड पाठविलें होतें. त्यावर आणखी ।=* पाठवा म्हणजे अंक सुरू करूं. मी ।= ची तिकिटे पाठविण्यास तयार आहें. पण
आपण एवढे थोर गृहस्थ असून आमचा आपणास बिलकूल विश्वास नाहीं. अहो
मेहेरबान, मी जगबुडव्या नव्हें. मि. xx शेंकडों लोकांची वर्गणी घेऊन बुडविली. तसेंच xx यांनीही आमची वर्गणी बुडविलीं. तसेंच xx यांनीही
आमची वर्गणी बुडविली पण आम्ही तिकडे कानाडोळ'ही केला नाही. पण आपण
* सहा आणे.