बहिष्कृत भारताचें ऋण हें लौकिक ऋण नव्हे काय ? - Page 384

आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन ३४०

पुष्कळ पत्रकर्त्यांनीं माझे पैसे अंक बंद पाडला. नुसते ।= वर आणून माझा

पै सुद्धां डुबविली नाहीं. या ।= नीं माझा बुडविले, पण मी कोणाची नुसती १

व्हावें पण स्वार्थ नसावा असें माझे मत आहे.” कोणता झेंडा लागेल. समाजहित

परंतु कांहीं वर्गणीदारांची वागणूक इतकी नाठाळ होती कीं, वरील प्रकारच्या खट्याळ वर्गणीदारास मला म्हणावेसे वाटतें. जवळ जवळ चारशें लोकांनी वर्गणीदार होऊन, नऊ दहा अंक घेतले व व्ही. पी. च्या वेळीं ती नाकारून व्ही. पी. च्या खर्चाचा तसेंच मागील अंकांच्या खर्चाचा बोजा पत्रावर बसविला. खरें म्हटलें असतां या बेजबाबदार वर्तनास कसलेच कारण

नव्हतें. ज्यांच्या ज्यांच्याकडे बहिष्कृत भारत पाठविण्यात आलें, त्यांना त्यांना, पहिल्याच अंकात अशी सूचना करण्यात आली होती कीं, “आपण वर्गणीदार व्हाल या आशेने सदरील अंक आपल्याकडे पाठविण्यात आला आहे. आपणास वर्गणीदार व्हावयाचे नसेल तर उलट टपालीं कळवावे. जर आपणाकडून कांहींच लिहून आलें नाही तर आपण वर्गणीदार आहां असें समजून अंक चालू ठेवण्यात येईल.” परंतु दाभोळी चांभाराचे हिताकरितां जुन्या दमानें सामाजिक चळवळीच्या नव्या क्रीडांगणावर उतरलेले प्रसिद्ध क्रिकेटपटु रा. बाळू बाबाजी पालवणकर यांच्याशिवाय दुसऱ्या कोणीही लेभागुपणा करणाऱ्या वर्गणीदारानें या सूचनेचा विचार केला नाहीं. त्यांनीं मात्र लगेच कळविले की, “आपले पत्र आमच्याकडे Wed नये.” त्याबद्दल आम्हाला जरी आश्चर्य वाटलें, तरी विशाद वाटला नाहीं. कारण त्यांनी निदान नसत्या खर्चापासून आम्हांस वांचविण्याची मेहेरबानी केलीं. तशीच मेहेरबानी इतरांनी केली असती तर त्यांत कांहीं त्यांचे

वेचलें नसते:' आमच्या खट्याळ व नाटाळ वर्गणीदारांनीं व इतर आश्रयदात्यांनीं लक्षात ठेवावयास पाहिजे कीं, बहिष्कृत भारताची संपादकी हा इतर पत्रांच्या संपादकीप्रमाणें पैसे कमविण्याचा धंदा नसून, ही लोकजागृतीकरतां घेतलेली स्वयं दिक्षा होय. अशा लोकसेवेंत दिक्षीत झालेल्या इसमानें काढलेल्या पत्रास अशा

कांटेकोरपणानें वागविणें अनुदारपणाचें आहे.

अशा प्रकारचा अनुदारपणा व अनावस्था ज्या शिक्षक वर्गातून दिसून येते त्या

शिक्षक वर्गातून बहिष्कृत भारतास पुरेसे वर्गणीदार मिळतील अशी आशा बाळगणे

व्यर्थ आहे. वाचकांची वाढ होण्याच्या बाबतींत निराशाजनक स्थिती असल्यामुळें,

बहिष्कृत भारताच्या बुड़ीच्या निवारणार्थ दुसरी कोणती तरी कायमची योजना

करणें प्राप्त आहे व ती योजना आजच्या अंकात बहिष्कृत वर्गापुढे मांडावयाची

आहे. ती योजना म्हणजे बहिष्कृत नारतासाठी एक स्वतःचा छापखाना काढणें