बहिष्कृत भारताचें ऋण हें लौकिक ऋण नव्हे काय ? - Page 386

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ३४२

ग्रह करून घेऊं नयें. निदान टुम आहे असा कोणीही आपला स्वार्थपरायणतेची

नाही अशीं त्याची उमेद तसा संशय कोणी घेणार प्रस्तूतच्या लेखकाबद्दल

प्रमाणिक आहे किंवा अप्रामाणिक आहे, त्यानें आहे. फंड काढणारा इसम

आरंभिलेले कार्य हितकारक आहें, किंवा अहितकारक आहे याचा विचार केल्याशिवाय कोणत्याही फंडाला मदत करावयाची नाहीं अशी दृष्टीं ठेवणें अगदीं योग्य आहे. परंतु लुच्चे लोक फंड काढतात येवढ्याच गोष्टी पुढें करून चांगल्या कार्याला व प्रामाणिक लोकांनांहि मदत न करणाऱ्या कृपणांना सांगितले पाहिजें कीं, उघडपणें फंड न काढतां समाज कार्याचा आव घालणारे लोक एक तर नादान असले पाहिजेत, किंवा संभावित चोर तरी असले पाहिजेत. कोणत्याहि सार्वजनिकृ कार्याला फंडाची आवश्यकता ही असतेच.

सर्वारंभास्तंडुलाः प्रस्थमूलः

कोणताही यज्ञ करावयाचा झाला तर त्याकरितां आधीं तांदुळाची जरूरी पडतें हें जितकें खरें आहें तितकेंच सार्वजनिक कार्याला पैशाची जरूरी असतें हें खरें आहें. पाण्यावाचून वृक्ष नाहीं. पैशावाचून कार्य नाहीं. कार्य करण्याचा त्याचा निश्चय असल्यामुळें फंडाची योजना जनतेपुढे मांडण्यात प्रस्तुतच्या लेखकाने

रुसली भीड धरलीं नाहीं.

प्रश्‍न एवढाच आहे कीं, ज्यांच्यासाठी येवढी खटाटोप चाललीं आहें ते लोक या कार्यात अवश्य तो स्वार्थत्याग करण्यास तयार आहेत काय ?

मनुष्य जन्मतांच चार ऋणें पाठीवर घेऊन जन्मलेला आहे, अशी हिंदु धर्माच्या लोकांची पूर्वापार समजत आहे.

ऋणैश्चतुर्भिः संयुक्ता जायन्ते मानवा भुवि |

पितृदेवर्षिमनृजैर्देयं तेभ्यश्च धर्मतः Il

असें महाभारत सांगितले आहे. त्याप्रमाणें दरेंक माणूस पितृतऋण, देवत्रःण, ऋषिऋण व मानव म्हणजे लौकिक ऋण अशीं चार ऋणें आपल्या पाठीवर घेऊन जन्माला येतो. व तीं ऋणें मनुष्य मात्रांनी कोणकोणत्या पद्धतीने फेडावी हे

देखील वरील श्लोकाच्या उत्तरार्धात सांगितले आहे.

यज्ञैस्तु देवान्‌ प्रीणाति स्वाध्यायतपसा मुनीन्‌ ।

पुत्रैःश्रादधद्वैःपितृश्चापि आनृशंस्येन मानवान्‌ ॥

देवञऋण फेडण्यास यज्ञ करावा, ऋषीचे ऋण वेदाभ्यास करुन फेडावे, श्राद्ध करून बापाचे ऋण फिटते व लौकिक ऋण फेडण्यास माणसाने भूतदयेचा अवलंब