बहिष्कृत भारताचे . . . ऋण नव्हे काय ? ३४३
करावा. या सर्व ऋणांत, लौकिक ऋण अत्यंत श्रेष्ठ आहे इतकें कीं, देवऋण फेडलें नाहीं तरी चालेल कारण त्यामुळे देवाचा कोप होऊन तो आपला नाश करील इतकी शक्ति बिचाऱ्या हिंदु दैवतात उरली नाहीं. ऋषिं ऋण फेडलें नाही तरीही चालेल, कारण वेदाभ्यासावांचून आज कोणाचे काहीं नडत नाही. बाईच्या रेड्डी शास्त्र्यासारखे लोक ज्यांच्या पिढ्यान्पिढ्या वेदाभ्यासांत गेल्या अशा भिक्षुकांनाहि आपल्या मुलांना आर्यांचे वेद शिकविण्याऐवजी इंग्रजांचे वेद शिकविले, aa घालण्यासाठीं श्राद्ध जरी केले नाही तरीही त्यात वाईट होण्यासारखे कांहीच नाहीं. मृत्यूनंतर आत्म्याची गति कोणती याबद्दल अजूनही शंका आहे. अशा स्थितींत श्राद्धाने पितृतर्पण होईलच हे खात्रीनें कोणासच सांगतां यावयाचे
नाहीं. परंतु
लौकीक ऋण हें दरेकास फेडलेंच पाहिजे
त्याशिवाय गत्यंतर नाही. लौकिकऋणाची फेड ही जितकी पुण्यप्रद गोष्ट आहे तितकीच ती स्वहिताच्या दृष्टीनेही अवश्य आहे. ज्या ज्या मनुष्याला बुद्धि धन व सामर्थ्य हीं प्राप्त झालेलीं असतात त्या त्या माणसाने या साधनांचा उपयोग कसा करावा त्याचे नियमही sat घालून दिलेलें आहेत. त्या नियमानुसार त्यांनी आपल्या बुद्धीचा, धनाचा व सामर्थ्यांचा उपयोग निर्बुद्धास बोध देण्याकडे, अधनिकास सुख देण्याकडे, व निर्बलाचे संरक्षण करण्याकडे खर्च करणें यांतच खरें पुण्य आहें ; असे धर्मात सांगितलेले आहे. व आज जगांत त्याच भावनेने पुष्कळसे परोपकाराचे काम होत आहे. परंतु परोपकारापासून पुण्य प्राप्त होते येवढ्यामुळेंच लौकिकाचीं कामें करावीत असें नाहीं. तर त्यापासून स्वहित साधतें म्हणूनहीं ती करणें प्राप्त आहे. समाजाच्या सुधारणेखेरीज व्यक्तिमात्राची सुधारणा होणें शक्य नाहीं. व्यक्तीच्या आजूबाजूचे नेतिक वातावरण जर दूषित झालेलें असेल, तर व्यक्तिमात्राला पावित्र्य व उन्नति कशी करून घेतां येईल ? मनुष्याला समाजाबरोबरचा आपला संबंध तोडतां येत नाहीं, त्याला आपले आयुष्य आपल्या बांधवातच काढावे लागतें. त्याचा जीवनक्रम त्यांच्यामुळे त्याला चालवता येतो व त्यांच्यामध्येंच तो आपल्या जीवनाचा व्यय करतो. असे असल्यामुळे त्याला आपल्या भोवतालच्या परिस्थितीचे परिणाम भोगावे लागतात. आणि जोपर्यंत त्याच्या बांधवांच्या परिस्थितीची उन्नत अवस्था झाली नाहीं तोपर्यंत त्याला तें टाळता येत नाहीं. ऐहिक परिस्थितीसंबंधाने विचार करतांही असेंच दिसेल कीं, सर्वाच्या अभ्युदयाशिवाय कोणाही एकाची ऐहिक स्थिती सुधारणे शक्य नाहीं. जेथें साऱ्या व्यक्ति asad खितपत पडल्या आहेंत तेथे कोणाला श्रीमंती प्राप्त होऊ शकेल ? यास्तव एक गोष्ट उघड आहे