बहिष्कृत भारताचें ऋण हें लौकिक ऋण नव्हे काय ? - Page 388

३४४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

कीं, परोपकार करावयाचा तो केवळ पुण्याचा मार्ग म्हणून करावयाचा नसून, तो आत्मोन्नतीचा मार्ग आहे म्हणूनहीं पत्करला पाहिजे. या लौकिक ऋणाची फेड करणे कां आवश्यक आहे हे एकदां समजलें म्हणजें समाजाची दशा आणि लौकिक क्रणाचा बोजा यांचें प्रमाण व्यस्त कां असलें पाहिजें हेही ध्यानात येईल. जितकी समाजाची अवनत दशा झाली असेल, त्या मानानें त्यातील व्यक्तीवरील लौकिक ऋणाचा भारही फार मोठा असला पाहिजे. त्याशिवाय समाज वर येणें शक्‍य नाही. उलटपक्षी जितकी समाजाची दशा उर्जित असेल त्या मानानें त्यातील व्यक्तिवरील लौकिक ऋणाचा भार कर्मी झाला पाहिजे. परंतु आश्चर्याची गोष्ट हीं कीं, या लौकिक ऋणाची कल्पना जितकी ब्राह्मण समाजात रुजलेली आहे तितकी अस्पृश्य समाजांत रुजलेली नाहीं. ब्राह्मण वर्ग हा कांही खालावलेल्या लोकांचा वर्ग नव्हें. त्यातील दरेक व्यक्ति आपले स्वतःचे हित रक्षण करण्यास शिक्षणाने व द्रव्यानें सामर्थ्यवान आहे. कांहीं झालें तरी ब्राह्मण भिक्षुकी करून पोट भरण्यास धर्माने मोकळा असल्याकारणानें ब्राह्मण जात अवनत होण्यांचे भय नाही व म्हणूनच कीं काय

जाय मानो वय ब्राम्हणस्तभि ऋणवा जायते

या श्रुति वाक्याप्रमाणें ब्राह्मणाला फक्त तीनच ऋणें सांगितलीं आहेत व या तीन ऋणांत लौकिक ऋणाचा समावेश केलेला नाही. तथापि आपल्या समाजास उन्नत दशेत ठेवण्यास ब्राह्मण वर्गातील लोक लौकिक ऋणाचा भार वाहण्यास जितके तत्पर असतात तितके अस्पृश्य वर्गाचे लोक आपल्या समाजासाठी शास्त्राज्ञा असतांही तत्पर असत नाहींत ही मोठ्या खेदाची गोष्ट आहे, असे प्रस्तूतच्या लेखकांस म्हणणे प्राप्त आहे. प्रस्तुतच्या लेखकानें समाजकार्याप्रीत्यर्थ जेवढा स्वार्थत्याग करणे त्यास शक्य होते तेवढा स्वार्थत्याग त्यानें केला आहे. तो कांहीं संस्थानिक नाहीं, किंवा जहागीरदारहिं नाहीं. किंवा रानांत नाहीं शेत व गांवात नाहीं घर असें त्यांच्यासंबंधी एकानें केलेले विधान सत्य आहे. कांहीं झालें तरी म्हणण्यासारखी द्रव्यानुकूलता नसता इंग्रज सरकारने देऊ केलेली दरमहा अडीच हजार रुपयांपर्यंत वाढूं शकणारी नोकरी त्याने मला नको म्हणून सांगितलीं. वकिलीसारख्या स्पृश्य लोकांवर अवलंबून असणाऱ्या धंद्यांत विशेष किफायत मिळण्याची आशा नसताही केवळ समाजकार्य करण्यास मोकळीक असावी म्हणून त्यानें तो पत्करिला आहे. रूढधर्माचारांतील आणि लोकाचारांतील दोषांचें निर्भयपणें आविष्करण करण्याचें भयंकर कार्य हाती घेतले असल्यामुळे, देशाभिमानी व धर्माभिमानी म्हणविणाऱ्या पत्रांकडून होत असलेल्या शिव्यांचा व शापांचा भडिमार तो एकसारखा सोशीत आहे. स्वमतांचें मंडन व तदनुसार