बहिष्कृत भारताचें ऋण हें लौकिक ऋण नव्हे काय ? - Page 389

बहिष्कृत भारताचे . . . ऋण नव्हे काय ? ३४५

होईल तेवढे वर्तन करण्याचें त्यानें ठरविल्यामुळें स्पृश्य वर्गातील आपल्य फार दिवसांच्या मित्रांचा दीर्घ रोष त्याने आपणावर करून घेतला आहे व तेणे करून त्याच्या हातून त्याच्या धंद्यांत त्यास मिळू शकणाऱ्या मदतीस तो दुरावला आहे. कवडीचा फायदा नसतांना त्यानें एक वर्षाच्या आंत बहिष्कृत भारताचें बऱ्याच वाईट रीतींने रकाने भरून काढून लोक जागृतिचें काम केले. वते करतांना त्याने आपल्या प्रकृतीकडे, सुखाकडे, चैनीकडे व ऐष आरामाकडे न पाहता डोळ्याच्या वाती केल्या इतकेच नव्हे तर प्रस्तुतचा लेखक परदेशी असतांना रात्रंदिवस ford प्रपंचाची काळजी वाहिली व जिला अजूनहि वाहावी लागत आहे व तो स्वदेशी परत आल्यानंतर त्याच्या fafta दशेत शेणीचे भारे स्वतःच्या डोक्यावर वाहून आणण्यास जिणे मागें पुढें पाहिले नाहीं अशा अत्यंत ममताळू, सुशील व पूज्य स्त्रीच्या सहवासात दिवसाच्या २४ तासांतून अर्धा तासही त्याला घालवितां येत नाहीं. प्रस्तुतच्या लेखकाने जो स्वार्थत्याग केला आहे त्यांत त्याने विशेष कांही केले आहे असे नाही व प्रस्तुतचा लेखक तसे म्हणतही नाही उलट ज्या परमेश्वराने त्यास एका अस्पृश्य जातीस जन्मास घालून या मानवोद्धाराच्या मंगल कार्यात आपला देह झिजविण्याची जी त्यास संधि दिली हा त्याच्यावर मोठा उपकार झाला असे समजून त्या परमेश्वराला तो शतशः धन्यवाद देऊ इच्छितो तथापि त्याचे म्हणणें असें आहे कीं, दरेक अस्पृश्य माणसावर जो लौकिक ऋणाचा बोजा जन्मताच पडलेला आहे त्या ऋणाची जाणीव प्रस्तूतच्या लेखकास पूर्णपणें आहे व त्याने समाज कार्याप्रीत्यर्थ जे कांही केलें आहे तें त्याच्यावर असलेल्या लौकिक ऋणाची थोडी बहुत फेड करावी या भावनेनेच केलें आहे. त्याची इतकीच अपेक्षा आहे की, त्याच्या इतर अस्पृश्य बंधूंनींही या लौकिक ऋणाची बूज ठेवावी. बहिष्कृत भारताचे कार्य एकट्याचे तर नाहीच ते एकट्याने होणारेहि नाही. दसकी लकडी एकका बोजा झाला तरच ते तडीस जाईल. नाही तर त्याचा मध्येंच लोप होईल. प्रस्तूतच्या लेखकास आशा आहे की, त्याचे अस्पृश्य बंधु त्याचा लोप होऊ देणार नाहीत.

अग्रलेख : बहिष्कृत भारत, ता. ३ फेब्रुवारी १९२८.