के. श्रीधर बळवंत टिळक - Page 390

७७
कै. श्रीधर बळवंत टिळक

श्रीधर पंताचे खालील पत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऑफीसात मुंबईत येऊन पोहोचले तेव्हा ते जळगावला २६ मे १९२८ ला भरविण्यात येणाऱ्या सभेसाठी तिकडे गेलेले होते. श्रीधरपंताच्या मृत्यूची बातमी वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाली तेव्हा समतासंघाचे चिटणीसांनी ती तारेने बाबासाहेबांना कळविली. तेव्हा बाबासाहेबांच्या मनात जे विचारतरंग उठले त्यांचे शब्दचित्र त्यांनी एका लेखात रेखाटले व तो लेख ' दुनिया ' साप्ताहिकाने छापला. श्री. श्रीधर बळवंत टिळक यांनी आत्महत्त्या करण्यापूर्वी डॉ. आंबेडकर यांना जे पत्र पाठविलेले होते, त्याचा संपूर्ण ब्लॉक (पत्त्यासह) 'दुनिया' साप्ताहिकाने शनिवार तारीख २ जून १९२८ च्या सातव्या अंकात ३ पानावर छापलेला होता, तो असा :--

पाकीटावरील पत्ता :--

STAMPED

To,

Dr. B. R. Ambedkar, M.A., Ph. D., D. Sc.

M. L. C., Bar-at-Law.

Damodhar Hall, Parel.

Bombay, 12. From: S. B. Tilak

Gaikwad Wada

668 Narayan Peth

Poona City

25-5-1928

|| श्री ॥

गायकवाड वाडा,

पुणे, ता. २५ मै १९२८ क्‌. सा. न. वि. वि. |

हे पत्र आपले हाती पडण्यापूर्वी बहुदा मी इहलोकास रामराम ठोकल्याची वार्ता आपले कानी पडेल ! आपल्या ' समाज-समता-संघाचे ' अंगीकृत कार्य नेटाने पुढे चालू ठेवण्यासाठी सुशिक्षित व समाज-सुधारणावादी तरुणांचे लक्ष या