के. श्रीधर बळवंत टिळक - Page 391

कै. श्रीधर बळवंत टिळक ३४७

चळवळीकडे अधिकाधिक वेधून घेणे आवश्यक आहे. आपण या कामी अहर्निश झटता याबद्दल मला फार संतोष वाटतो व आपले प्रयत्नांस परमेश्‍वर यश देईल अशी खात्री वाटते. महाराष्ट्रीय तरुणांनी मनावर घेतल्यास अस्पृश्यता-निवारणाचा प्रश्‍न अवघ्या पाच वर्षात सुटेल. माझ्या बहिष्कृत बांधवांची गाऱ्हाणी प्रत्यक्ष भगवान्‌ श्रीकृष्णाचे चरणारविंदी सादर करण्यासाठी मी पुढे जात आहे. तरी मित्रमंडळीस माझा सप्रेम नमस्कार सांगावा. कळावे, लोभ असावा, ही विनंती.

आपला AF,

श्रीधर बळवंत टिळक

२५-५-१९२८ 10,

Dr. 8. R. Ambedkar,

Bar-at-Law.

Damodhar Hall, Bombay, 12.

आयुष्य हे जगण्यासाठी आहे, जगता जगता जनांना अज्ञानाच्या झोपेतून जागे करणे व त्यांना मानाने जीवन जगण्यासाठी झगडावयास तयार करणे, हे मानवी जीवनाचे श्रेष्ठतम ध्येय आहे ; आणि आत्महत्या करणे हे पराभूत जीवनाचे नीचतम द्योतक आहे, हे बाबासाहेबांच्या आत्मजीवन ध्येयाचे सुंदर चित्र या लेखात दृग्गोचर झालेले आहे. |

बाबासाहेबांनी आपल्या भावना प्रदर्शित करणारा लेख दुनिया पत्रासाठी लिहिला, तो त्या पत्राने प्रसिद्ध केला. तो असा :--

कै. श्रीधर बळवंत टिळक

ले. डॉ. भीमराव आंबेडकर

मी ता. २६ मे ला जळगाव येथे बहिष्कृत वर्गाच्या सभेकरिता गेलो होतो. आदल्या दिवशी मी जेव्हा मुंबईहून निघालो त्याच दिवशी रा. श्रीधर बळवंत टिळक यांचे एक पत्र मला आले होते. त्यात आपल्याला दापोलीच्या सभेला येता आले नाही याबद्दल वाईट वाटते वगैरे मजकूर होता. त्यात आत्महत्त्या करण्यासारखा प्रसंग ओढवला आहे असा ध्वनि उमटण्यासारखे काहीच नव्हते. दुपारी फार उन्ह असल्यामुळे रा. लबाचंद यांच्या अध्यक्षतेखाली सभा संध्याकाळी ६ वाजता सुरू झाली. सभेस पाच हजार लोक आले असल्यामुळे