कै. श्रीधर बळवंत टिळक ३४९
श्रीधरपंतांचा समावेश व्हावयास पाहिजे होता. राजकीय दृष्ट्या ते काही मवाळ नव्हते-जहाल, सुताळ आणि बेताल या सर्वांच्यापेक्षा ते फारच पुढे गेलेले होते. तेव्हा त्यांच्या लिखाणाने केसरीला काही धोका नव्हता. असे असताना त्यांना केसरीत जागा मिळाली नाही, याचे मला राहून राहून मोठेच आश्चर्य वाटते. केसरीत जागा मिळाली असती तरीही केसरी कंपूचा भांड लागून जे व्हायचे ते झालेच असते असे काही लोक म्हणतील. कसेही असो. एवढी गोष्ट खास की, निदान पैशापायी काही भांडण झाले नसते. कारण श्रीधरपंत यांची मनोवृत्ति त्या दृष्टीने अनुदार नव्हती. तसे जर ते असते तर वडिलांची इच्छा पुरी पाडण्याच्या हेतूने त्यांनी ट्रस्ट डीडवर बिनतक्रार सह्या केल्या नसत्या व आज जे केसरीचे ट्रस्टी म्हणून वावरत आहेत त्यांना तसे वावरता आले नसते. केसरी कंपूवर हा त्यांनी केवढा उपकार केला आहे याची आठवण केसरी कंपूला असती तर किती बरे झाले असते
श्रीधरपंतांचा मृत्यू हा खरोखर दैवदुर्विपाकाचा एक मासला आहे. मनुष्यमात्रःच्या आयुष्याच्या पूर्ततेस अवश्य असलेली सामुग्री कै. श्रीधरपंतांच्या भाग्याने त्यांच्या उशास ठेवलेली होती. साधनसामुग्रीचा उपयोग करण्याइतकी बुद्धिमत्ताही त्यांना होती. सार्वजनिक कामाची कळकळ व एखादी गोष्ट तडीस नेण्यास अवश्य असणारी धडाडी या दोन्ही गोष्टी त्यांच्यात ओतप्रोत भरलेल्या होत्या. त्यांचा स्वभाव अगदी प्रेमळ असल्यामुळे जनतेला वश करून घेण्यात त्यांना अवधी लागला नसता. अशा सर्वतोपरी पुढारीपणास लायक असलेल्या तरुणाचा अंत झालेला पाहून कोणास खेद होणार नाही ?
सामाजिक सुधारणेच्या बाबतीत त्यांचा जहालपणा सर्वांनाच माहीत आहे. समता संघाच्या कार्यावर त्यांनी किती भर दिला होता हे त्यांच्या पत्रावरुन उघड होत आहेच. समता संघाच्या स्थापनेचा पश्चात्ताप होऊन आत्महत्त्या केली, अशा मूर्खपणाच्या वल्गना करणाऱ्या भालाकाराने आपला शहाणपणा आटोपता घ्यावा, हे बरे. समता संघाच्या कार्याला त्यांना किती अंतिम स्वरूप द्यावयाचे होते, हे त्यांनी आपल्या गायकवाड वाड्यावर नुसते समाज समता संघ असे नाव न देता ' चातुर्वर्ण्यं विध्वंसक समाज समता संघ [' ] हे नाव दिले, यावरून [सिद्ध ] [होत ] आहे. त्यांनी, आपल्या वडिलांची समाजकार्य वगळण्यात चुकी झाली, [हे ] प्रांजळपणे कबूल केले, यातच त्यांचा मोठेपणा दिसून येतो. त्यांना स्पष्टपणे कळून आले होते की, अर्ध शतक राजकारणाचा अट्टाहास [करूनही ] [त्याच्या ] फलश्रुतीच्या आड जर कोणती एकादी गोष्ट आली [असेल ] [तर ] [समाजकारणाचा ] अभाव हीच होय. या समजुतीप्रमाणे त्यांचा उद्योगही चालला [होता. ] तो उद्योग किती धडाडीचा होता, हे कोणासही [सांगण्याचे ] [कारण ] [नाही. ]