के. श्रीधर बळवंत टिळक - Page 394

३५० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

हल्लीच्या काळी महाराष्ट्रातील तरुणांत श्रीधरपंतांच्या तोडीचा तरुण सापडणे अत्यंत कठीण आहे. तरुण महाराष्ट्र परिषदेत जिभल्या पाजळणारे तरुण कोणीकडे आणि आमचे श्रीधरपंत कोणीकडे ? ठरावांतील रेलचेल करून गिरीकंदरी लपून बसणाऱ्या तरुणांतील भेकड तरुण ते नव्हते. त्यांचा निश्‍चय, जोम व कर्तबगारी ही सारी अवर्णनीय होती. ते जगले असते तर महाराष्ट्रातील अस्पृश्यता निवारण्याचे महान कार्य त्यांनी तडीस नेले असते. याचमुळे श्रीधरपंतांच्या मरणासंबंधी मला थोडा राग येतो. सामाजिक सुघधारणेच्या अंगीकृत कार्यात आपणास केवढे स्थित्यंतर घडवून आणता येईल याची त्यांना यथार्थ कल्पना असावयास पाहिजे होती व त्या कार्यासाठी तरी निदान त्यांनी जगावयास पाहिजे होते. नुसत्या जगण्यात हशील नाही हे तत्त्व मलाहि मान्य आहे. परंतु सफल जीवित स्वार्थासाठी नाही, तरी परार्थासाठी साठवलेच पाहिजे. श्रीधरपंतांना याचा विसर पडला.

मला त्यांच्यासंबंधी काय वाटते हे मी त्यांच्या निधनासंबंधीचा लेख लिहिण्यास उद्युक्त झालो आहे, यावरून सर्वांना जाणता येण्यासारखे आहे. कै. श्रीधरपंत टिळक एका ब्राह्मण्याभिमानी गृहस्थाचे चिरंजीव. त्यांचे वडील लो. टिळक यांना १९१९ साली जेव्हा मी मूकनायक पत्र चालवीत असे त्यावेळी, दर अंकात जरी नसले तरी अंकाआड, शिव्याशापांची लाखोली वहात असे. ब्राह्मण्याशी अहर्निश झगडणाऱ्या माझ्यासारख्या अस्पृश्य जातीतील एका व्यक्तीने ब्राह्मण्याभिमानी व्यक्तीच्या पोटी जन्मास आलेल्या श्रीधरपंतांचे मरणाने दुःखित व्हावे, हा योगायोग तर त्याच्याहीपेक्षा विशेष विलक्षण आहे, हे कोणीही कबूल करील. परंतु, हा योगायोगच श्रीधरपंतांच्या मोठेपणाची एक मोठी साक्ष आहे. कोणी काहीही म्हणो, श्रीधरपंतांच्या वडिलांना लोकमान्य ही पदवी अयथार्थ होती. तेली, तांबोळी म्हणून बहुजन समाजाचा उपहास करणाऱ्या व्यक्तीला लोकमान्य म्हणणे म्हणजे लोकमान्य या Maral विपर्यास करणे, असे आमचे मत आहे. लोकमान्य ही पदवी जर टिळक घराण्यापैकी कोणा एकास साजली असती तर ती श्रीधरपंतासच होय. टिळकांच्या हातून लोकसंग्रह झाला नाही. खरा लोकसंग्रह श्रीधरपंतच करू शकले असते. तो करण्यास ते उरले नाहीत, ही महाराष्ट्रावरील