आजवरि होतों तुझे सत्तेखाली | तोवरि तों केली विटंबना - Page 396

७८
आजवरि होतों तुझे सत्तेखाली [| ]
तोंवरि तों केली विटंबना

मंगळवार ता. २३ ऑक्टोबर १९२८ रोजी विजयादशमीच्या [सुमुहूर्तावर ] [अस्पृश्य ] वर्गाच्यातर्फे डॉ. आंबेडकर व डॉ. सोळंकी [यांची ] [सायमन ] [कमिशनपुढें ] [साक्ष ] झाली. तींत अस्पृश्य वर्गातर्फे चार मागण्या मागण्यांत [आल्या. ] (१) मुंबई इलाख्यांत संपूर्ण स्वराज्य स्थापन करण्यात यावें, (२) अस्पृश्य वर्गाचा हिंदूत समावेश न करता तो वर्ग हिंदू समाजापासून अलग व स्वतंत्र आहे, असें मानण्यात यावे, (३) नवीन होणाऱ्या कायदे कौन्सिलात मुसलमान लोकांचे प्रतिनिधि [ज्या ] प्रमाणांत घेण्यात येतात त्याच प्रमाणात अस्पृश्यांचे प्रतिनिधि घेण्यात यावेत. (४) बहुजन समाजाच्या हातून त्यांच्या हिताची जी पायमल्ली होते व त्यांच्यावर जो जुलूम होतो, त्यापासून त्यांचा बचाव होण्याकरितां कायद्याने कांही हक्क- संरक्षक अटी घालण्यांत याव्यात.

या मागण्या प्रसिद्ध झाल्यापासून स्पृश्य हिंदूंकडून जे टीकेचें सत्र सुरू झालें आहे, तें पाहून आम्हांस विस्मय वाटतो. ज्या एका मुद्यामुळें त्यांच्या आंगाचा भडका झाला आहे तो मुद्दा म्हणजे अस्पृश्य समाजास हिंदू समाजापासून पृथक्‌ करण्यात यावें, हा होय. ज्या लोकांचें पित्त या मागणीनें इतकें खवळून गेलें आहे त्या लोकांनी हिंदु समाजाचा आणि अस्पृश्य समाजाचा काय संबंध आहे, हें आम्हांस दाखवून द्यावें, असें त्यांस आम्हीं आव्हान करतों. समाजाच्या एकीकरणाला सहभोजन व सहविवाह, हे दोन विधी कारणीभूत होत असतात. हे दोन विधी जेथें चालूं असतात तेथें सर्व व्यक्ती एका तान्यांत विणल्या जाऊन त्यांचा एक समाज बनूं शकतो. एकीकरणाचे हे दोन मुख्य विधी स्पृश्य-अस्पृश्य यांत मुळींच चालूं नाहींत इतकेंच नव्हे तर ते चालूं करा असें म्हटले की, पायाची तिडीक मस्तकाला जाते आणि अस्पृश्य लोक आर्य स्त्रीचा अभिलाष धरतात म्हणून गिल्ला केला जातो. सहभोजन व सहविवाह तर राहोच पण ज्यांच्यात साधा सहवासहि नाहीं अशा स्पृश्य व अस्पृश्य हिंदूंत असा कोणता दुवा आहे कीं, ज्याच्यामुळे त्या उभयतांची मिळून एक साखळी झाली आहे, असें म्हणता येईल ? अस्पृश्य समाज व स्पृश्य समाज एकाच