` आजबवरि होतों तुझे . . . केली विटंबना ३५३
संस्कृतीखालीं किंवा धर्माखाली वाढले असतील व मोडत असतील. परंतु केवळ एका संस्कृतीखालीं वाढलेल्या लोकांना एका समाजाचे घटक म्हणावयाचें असे ठरलें तर मग ' समाज ' हा शब्द निरर्थक होईलच पण समजुतीचाहि मोठा घोटाळा उडेल. कारण संस्कृती आणि समाज या दोन गोष्टी अगदी भिन्न आहेत. एका समाजाची संस्कृति एकच असते. हे खरे. परंतु एका संस्कृतीचे लोक ते एकाच समाजाचे घटक, हा नियम सर्वत्र लागूं पडणार नाही. उदाहरणार्थ, युरोपांतील सर्व लोक एका खिस्ती संस्कृतीखालीं वाढलेले आहेत. ते सारे एकच धर्म पाळतात. एकाच agen भजतात, जन्मापासून मृत्यूपर्यंत व्हावयाचे त्यांचे संस्कार एकाच फर्म्याचे असतात. पण तेवढ्यामुळें ते सर्व एका समाजाचे लोक आहेत, असे कोण म्हणूं शकेल ? एक धर्म असूनही त्यांच्यात फ्रेंच, जर्मन, इंग्लिश, इटॅलियन, बल्गेरियन, स्पॅनिश, पोर्तुगीज, वगैरे निरनिराळ्या समाजाचे लोक आहेत. तोच प्रकार हिंदूंचा आहे. स्पृश्य व अस्पृश्य यांची संस्कृति एक असली तरी ज्याप्रमाणे फ्रेंच आणि जर्मन हे समाज भिन्न आहेत त्याप्रमाणे स्पृश्य व अस्पृश्य यांचे समाज भिन्न आहेत. इतकेंच नव्हे तर युरोपांत जे अनेक लोक ` नांदत आहेत ते सर्व एका समाजाचे आहेत. असें म्हणणें जर एक पटींने मूर्खपणांचें होणार असेल, तर केवळ हिंदु संस्कृतींत वाढले म्हणून स्पृश्य व अस्पृश्य यांचा एकच समाज होतो असें म्हणणें शतपटीने मूर्खपणाचे होणार आहे.
स्पृश्य व अस्पृश्य या उभय समाजांत कोणताच सांधा नाही
अस्पृश्य हे हिंदूधर्मातर्गत असतील. पण ते हिंदू समाजांतर्गत खास नाहींत. अस्पृश्य समाज हा हिंदु समाजाहून निराळा आहे. या परिस्थितीस अनुलक्षून स्वराज्यघटनेंत त्या समाजाला हिंदु जातीपासून अलग मानण्यात यावें, असें सांगितले त्यांत वावर्गे तें काय झाले ?
कसेंहि असो, पण ज्या स्पृश्य हिंदूंनी अस्पृश्य लोकांना आपलेपणाने कधीही वागविले नाहीं त्या स्पृश्य हिंदूंना अस्पृश्यांबद्दल एकाएकी इतका पान्हा फुटावा, हें एक मोठें आश्चर्यच आहे ! ' हिंदूंत रहा ! हिंदूंत रहा ! फुटून जाऊ नका !' असा टाहो फोडून आम्हास जे सांगत आहेत त्यांना आम्ही असे विचारतो की, तुमचे आमचे सामाजिक नाते कांहीच नाही ! आम्ही निराळे तुम्ही निराळे ! सामाजिक दृष्ट्या जे निराळे आहेत ते राजकीय दृष्ट्या निराळे झाले तर त्यात तुमचे काय बिघडले ? परंतु तुम्ही आम्ही एका रक्तामांसाचे असे जर तुम्ही म्हणत असाल तर ज्या आज अगणित वर्षे आम्ही तुमच्यात राहिलों त्या अवधीत तुम्ही,
ड़ब्ल्यू-२०७३-२३ अ