आंबेडकर लेखन आणि भाषणे डॉ. बाबासाहेब ३५६
त्यांनी २१ मारामारी झाली असतांना निदान शंका आहे. हिंदुमुसलमानांची
व्हावा म्हणून खादी विणील त्यालाच दिवसांचे उपोषण केलें. खादीचा प्रसार
पण स्पृश्यास्पृश्यांमधील काँग्रेसचा मेंबर करावा असा त्यांनी आग्रह धरला.
एक दिवसहि देहदंडन अमानुष वागणुकीबद्दल आपली नापसंती दर्शविण्यासाठी
त्यांनी केलें नाहीं किंवा अस्पृश्यतानिवारण करींल तोच काँग्रेसचा मेंबर होईल असें ते म्हणाले नाहींत. आता तर म. गांधी म्हणजे उडालेला बार आहे. त्यांची कोणाला फारशी अपेक्षा नाहीं. महाराष्ट्रांतील राष्ट्रीय पुढारी तर कुटिलांचा कपू, पंडित जवाहिरलाल नेहरुच्या, राजकारण व धर्म यांची फारकत करण्यांत यावी,
या सरळ वाक्याचा वाकडा अर्थ लावून गेल्या मे महिन्यांत महाराष्ट्र प्रांतिक परिषदेनें अनेक प्रकारचे लपंडाव करून साधा अस्पृश्यता निवारणाचा ठराव परिषदेपुढें येऊं दिला नाहीं. त्यांच्याच तरुण पिढीने एक तरुण महाराष्ट्र परिषद
भरविली. _ नानातऱ्हेचे सामाजिक ठराव पास करून या तरुणांनी आपल्या
वाडवडिलांना भयभयीत करून टाकिलें. बिचारे अस्पृश्य मोठ्या आशेंने -यांच्याकडे पाहात होते. पण आपण केलेल्या सामाजिक ठरावांची पूर्तता करण्याऐवजीं हा तरुणांचा तांडा बारडोलीकडे झुकला. आणि आतां तो राष्ट्रीय स्वातंत्र्य कसें मिळविण्यांत येईले या विचारांत दंग झाला आहे. बारडोलीसारख्या
राजकीय चळवळीची त्याला जितकी चव लागते तितकी त्यास महाडच्या
सत्याग्रहाची चव लागू शकत नाही. बरें या हिंदू जातींनीं स्वतः कांहीं केलें नाहीं
तें नाहीं. पण अस्पृश्य लोक जें कांही करीत आहेत त्याला कांही सहाय्य, कांही उत्तेजन ! त्या नांवानेहि शून्य ! सेवासदनाला लाखो रुपये गोळा होतात, महिला
विद्यालयाला लाखो रुपये मिळतात, पण अस्पृश्यांसाठी काढलेल्या डिप्रेस्डक्लासेस मिशनला' पै देखील मिळत नाहीं. त्यांचे दार बसलें ! शिक्षणासाठी मदत
नाहीं ती नाहींच. सामाजिक उन्नतीला तरी कांहीं सहाय्य ! तेंहि नाही. अस्पृश्य
लोक आपली सामाजिक उन्नती करुं लागले तर त्यांचा उलटा छळ !! कांहीं
लोक ही गोष्ट खरी आहे असें मानावयास तयार नाहींत. त्यांना आम्ही असें सांगतो कीं, तुम्ही एकदां रत्नागिरी आणिं कुलाबा जिल्ह्यांत दौरा काढून बघा आणि
आम्ही म्हणतों तें खरें किंवा खोटे हें शोधून पहा. क्वचित एखादा गांव या दोन
जिल्ह्यात असेल कीं. ज्यात खोतांनी महारांकडच्या जमिनी काढून घेतल्या नसतील, गांवकऱ्यांनी त्यांचा बाजार बंद केला नसेल, त्यांचे गांवांतून अगर रानांतून हिंडणें फिरणें बंद केलें नसेल, त्यांची गुरें कोंडवाड्यात घातली नसतील
आणि त्याचा पूंज पसा बंद केला नसेल. कांही ठिकाणीं तर हा छळ इतका
बेफामपणें चालविण्यात आला की ज्याप्रमाणें परचक्र आले असतांना एका
† पाहा, परिशिष्ट क्रमांक-३९.