आजवरि होतों तुझे सत्तेखाली | तोवरि तों केली विटंबना - Page 401

आजवरि होतों तुझे . . . केली विटंबना ३५७

सैन्यांतील लोक शत्रूच्या सैन्यांतील लोकांवर छापे घालतात त्याप्रमाणे गांवच्यागांव महारवाड्यावर तुटून पडून बायकापोरासकट सगळ्यांना मारहाण करण्यात आली आहे. व कांही गतप्राण झाले आहेत. या जुलमांचे कारण काय तर अस्पृश्य लोकांनी गोमांस खाण्याचे बंद केलें, आणि जानवी घालून स्पृश्य हिंदुप्रमाणे वागूं लागले !! अस्पृश्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहून अशुद्ध अमंगल न राहतां स्वच्छतेने रहावे म्हणजे तुमची अस्पृश्यता सहज जाईल असे कंठशोष करून सांगणाऱ्या पुढाऱ्यांना आम्ही विचारतों, हीच कां तुमची कळकळ आणि अशी आमची

गळचेपी करण्यासाठीच कां गळ्याला मिठी Arai ?

या सर्व हकीगतीवरुन एक गोष्ट सिद्ध होते ती ही कीं, स्पृश्य हिंदु जातीला जो पान्हा फुटला आहे तो कांहीं अस्पृश्यांच्या हितासाठीं फुटलेला नाहीं. कधींही न पान्हवणारा हा टोणगा जो एकाएकीं इतका पान्हवला आहे, तो अस्पृश्यासाठींच पान्हावलेला नसून स्वत:साठींच पान्हवलेला आहे. अस्पृश्यलोक हिंदू समाजांतून फुटून गेले तर हिंदूसमाज कमकुवत होईल. हिंदुमुसलमानांच्या संस्कृतीच्या संग्रामांत हिंदूंचा नाश होईल, हें आम्हांस दिसते परंतु हिंदू समाजाचे काय होईल याचा विचार अस्पृश्य समाजाने काय म्हणून करावा ? ' महार मेला विटाळ गेला ' असे जसें हिंदु लोक म्हणतात त्याप्रमाणे ' हिंदु मेला पाप गेले ' असे म्हणून अस्पृश्याने स्वस्थ कां बसूं नये ? हिंदुसमाजाची नीति सगळ्या जगाच्या नीतीपेक्षां अगदी उलटी आहे. इतर समाजांत बाहेरचा मनुष्य आंत आला म्हणजे त्याचा दर्जा वाढतो. हिंदुसमाजांत आंतला माणूस बाहेर गेल्याशिवाय तो मानास चढत नाही. अस्पृश्य जोपर्यंत तो हिंदू राहील तोपर्यंत तो पशुपेक्षा नीच मानला जातो. तोच मुसलमान झाला तर सर्वापिक्षा श्रेष्ठ गणला जातो. यावरून उघड आहे कीं

अस्पृश्यांना हिंदुत्व हा शाप आहे.

तो कांही वर नव्हें. ज्या हिंदूच्या हिंदूत्वाचा शाप अस्पृश्यलोक भोगीत आहेत त्या अस्पृश्य लोकांनी हिंदुलोक मरतील कां तरतील याची चिंत! करण्याचे कांही कारण नाहीं. खरे म्हटले असतां हिंदू म्हणजे जगांतले मोठ्यातलें मोठें पाप आहे. ज्या हिंदुजातीने अनेक प्रकारचे कठोर निर्बंध घालून माणसांच्या माणुसकिची अहर्निश विटंबना चालविली आहे ती जात जगांतून नाहींशी झाली तर तिच्यासाठी कोण अश्रु गाळील ? हिंदूजात आपलें पाप आपल्या प्रांतातच ठेवील तरी बरें. पण नाहीं, जिकडे जाईल तिकडे ती आपल्या पापाची पेरणी