आजवरि होतों तुझे सत्तेखाली | तोवरि तों केली विटंबना - Page 402

आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन ३५८

उपद्रवी सिंध प्रांतात नाही. इतकी ही हिंदु जात आहे. केल्याशिवाय राहणार

आपलें पाप जेथें जाईल तेथे, जावो अथवा साऊथ आफ्रिकेंत जावों, हिंदुजात

नाहीं. कोठेही जावो, जगाच्या स्वच्छ पसरवल्या शिवाय स्वस्थ बसणार

जीवनाच्या Said आपले पातकी जीवन मिसळून त्यास ती अशुद्ध करणार नाहीं असें होणें नाहीं. या पतीत जातीला जगती तलावर थारा देणे ही मानव जातीच्या

हिताच्या दृष्टीने मोठी आपत्ती आहे. मनुष्यमात्रास तिच्या सान्निध्यांत राहावें लागणें हेंच आधीं मोठें दुर्भाग्य आहे. तिच्यांत समावेश करून घेणे आणि तिच्या सत्तेखाली वागणें म्हणजे तर जिवंतपणी नरक यातना भोगण्यासारखे आहे. अशा हिंदुजातीशीं संबंध ठेवण्यास कोण तयार होईल ? तिचा संसर्ग न व्हावा म्हणून अलग होणें यांतच खरें हित आहे, आणिं म्हणूनच तो मार्ग अस्पृश्यांच्या प्रतिनिधींनी

स्विकारला आहे.

अस्पृश्य समाजाला स्पृश्य समाजापासून निराळा करण्यांत यावा या साक्षींतील मुद्यावर विरोध व्हावयाचा तो अस्पृश्यांकडून व्हावयास पाहिजे होता. पण तसा विरोध त्यांच्याकडून झालेला नाहीं व होईल असें आम्हांस वाटत नाहीं. झालेल्या साक्षीवर त्यांचा आक्षेप आहे, नाहीं असें नाहीं. पण तो आक्षेप अगदीं

वेगळ्याच मुद्यावर आहे. त्यांचा मुख्य आक्षेप म्हणजे मुंबई इलाख्यांत संपूर्ण स्वराज्य स्थापन करण्यांत यावे अशी मागणी अस्पृश्यांच्या प्रतिनिधींनी करावयास नको होती. या आक्षेपाला वाचा फुटली नसली व त्याचा ध्वनी स्पष्टपणें जरी ऐकूं येत नसला तरी त्यांचा तसा आक्षेप आहें हे आम्ही जाणून आहों. आमच्यांत

व आमच्या अस्पृश्यबंधूत हा महत्वाचा मतभेद असल्यामुळे हा आक्षेप विचारांत घेणे अपरिहार्य झालें आहे व स्पृश्यांच्या आक्षेपाबरोबर अस्पृश्यांच्याहि आक्षेपाचे निरसन करण्याचें आज आम्ही योजिलें आहे. या आक्षेपाचे मूळ

हिंदुपेक्षां इंग्रज बरें.

या भावनेंत आहे हें निर्विवाद आहे. ही भावना अस्पृश्य वर्गांत किती खोल गेली

आहे याची कल्पना स्पृश्य हिंदूस करतां येणे शक्‍य नाही. इंग्रजांचे राज्य म्हणजे रामाचें राज्य अशी अस्पृश्य लोकांची इंग्रजाविषयींची निष्ठा आहे. आणि त्या निष्ठेला त्यांच्या हृदयांत ठाव मिळण्यास तशी सबळ कारणेहि घडली आहेत. ज्या पेशवाईच्या काळांत! अस्पृश्यांना रस्त्यांत थुंकून तो अपवित्र करतील

म्हणून गळ्यांत ASH बाळगावें लागत असें; अस्पृश्य कोण हें ओळखण्यात यावे

म्हणून हातांत खुणेसाठीं काळा दोरा बांधावा लागत असें, चालून "षित झालेली

धूळ वाहून जावी व पवित्र हिंदुजातीस तीवरून चालण्याचा प्रसंग पडूं नये म्हणून

t पाहा, परिशिष्ट क्रमांक-८