आजवरि होतों तुझे . . . केली विटंबना ३५९
कमरेस काठ्यांचा खराटा लटकावावा लागत असे, त्या पेशवाइचा जो अस्पृश्य अंग्लाईशी तुलना करील, त्याला एकी संबंधाने द्वेष व दुसरी संबंधानें प्रेम वाटलें तर त्यात कांहीं आश्चर्य नाही. पेशवाईतून अंग्लाईत संक्रमण झालेल्या अस्पृश्यांच्या स्थितींत व महाभारतांत सांगितलेल्या कपोतपक्षाच्या स्थितींत एक प्रकारचें साम्य दिसून येते. जसा श्येनपक्षी मागे लागला असतांना तो गरीब बिचारा कपोत जीव घेऊन शिबीराजास 'रक्ष रक्ष' म्हणून शरण गेला, त्याचप्रमाणे अस्पृश्यजनता ही स्पृश्य जनतेच्या अमानुष छळास त्रासून इंग्रजप्रभूस शरण गेली असून त्याच्या आश्रयाखाली आज ती आपले दिवस कंठीत आहे. अशा परिस्थितींत वाढलेली अस्पृश्यप्रजा शिबीचा आधार तुटला असतांना, श्येनपक्षाने जी कपोताची गत केली असती तशीच इंग्रजांचा आधार तुटला असताना, स्पृश्य जनता आपली गत करील या भयानें स्वराज्याच्या मागणीस बिचकली तरी तिला कोणी प्रमाणिक व विचारवंत मनुष्य दोष देईल असें आम्हास वाटत नाहीं. तथापि इंग्रज सरकारवर सर्वस्वी विसंबून राहणाऱ्या अस्पृश्य बंधूस आमचा असा इषारा आहे कीं, इंग्रज प्रभु हा खरोखरीच शिबीचा अवतार आहे कीं काय याबद्दल त्यानी आपली खात्री करुन घ्यावी. एकीकडे 'नुपेक्षावें शरणागता' अशी करुणा भाकणारा कपोत व दुसरीकडे 'ज्याचे त्यास द्यावें निश्चित', असा शास्त्रार्थ सांगणारा श्येनपक्षी, या दोहोंच्या कचाट्यांत सांपडलेला शिबी, ज्याप्रमाणे आपले मांस देऊन आत्मनाश झाला तरीपण कपोताचे रक्षण करण्यास तयार झाला त्याचप्रमाणे स्वतःचे कांहींही होवो पण अस्पृश्यांचे हित करू हें इंग्रजसरकारचें ब्रीत आहे, याची हमी कोणता अस्पृश्य देऊं शकेल? व इंग्रजप्रभूला तुम्ही शरण गेला पण त्या
इंग्रजप्रभूनें तुमच्यासाठी काय केलें आहे ?
मुंबई प्रांतात इंग्रजी अम्मल YS झाल्यास एक शतकाधिक वर्ष झाली या अवधींत ज्या अस्पृश्यतेमुळें तुमची माणुसकी नष्ट झाली आहे त्या अस्पृश्यतेचे उच्चाटन झालें आहे काय ? ज्या अज्ञान अंधकारांत तुम्हाला तुमच्या देशबांधवांनी खितपत ठेविलें होते त्या अंधकारांत इंग्रजप्रभुनें केवढीशी ज्ञानाची ज्योत पेटविली? सरकार दरबारी जी तुम्हांस बंदी होती ती उठवून त्या बाबतीत तुमचा कितपत प्रवेश झाला आहे ? ज्या दारिद्र्यात तुम्ही लोळत पडला होता त्यातून वर कादून तुम्हांला सुखाचा व संपत्तिचा लाभ व्हावा एतदर्थ इंग्रजांनी तुमच्यासांठीं कोणते प्रयत्न केले ? या सर्व प्रश्नांची उत्तरें इतर कोणी कोणत्याही तऱहेने देवोत, आम्हाला तरी ती नकारार्थीच देणें प्राप्त आहे. इंग्रजी अमदानींत अस्पृश्यांच्या